दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा – सचिन सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

Mumbai
Maharashtra Pradesh Congress Committee general secretary and spokesman Sachin Sawant
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत

९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी आमानुषपणे मारहाण केली. ‘ही अमानवीय आणि बेकायदेशीर कृती करणाऱ्या पोलिसांचे तत्काळ निलंबन करून सर्व दोषींवर कारवाई करावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात आज राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्याचबरोबर ‘दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा’, अशी मागणीही त्यांनी केली. ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचे सांगून काँग्रेस नेत्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. काळ्या फिती लावून काँग्रेस शिष्टमंडळाने आपल्या तीव्र भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.

हेही वाचा – मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या NSUIच्या कार्यकर्त्यांना मारहाण

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

पोलीस महासंचालकांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करून विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना सदर प्रकाराची चौकशी करणायाचे आदेश दिल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच ‘चौकशीचा अहवाल येताक्षणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी यथवंत हाप्पे, राजन भोसले, राजेश शर्मा, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा समावेश होता.

हेही वाचा – सोलापूर दौरा; मोदींनी फुंकले लोकसभेचं रणशिंग

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here