घरCORONA UPDATECoronavirus : मुंबईतले कोरोना कंटेनमेंट झोन आता गुगल मॅपवर!

Coronavirus : मुंबईतले कोरोना कंटेनमेंट झोन आता गुगल मॅपवर!

Subscribe

मुंबईतील हे झोन गुगल मॅप्सवर आणण्याची किमया केली आहे ती एका मुंबईतीलच अर्बन डिझायनरने.

कोरोना व्हायरसमुळे मुंबईतले वाढते कंटेनमेंट झोन पाहता या संकटात मदतीचा हात म्हणून हे झोन आता गुगल मॅपवर येणार आहेत. मुंबईतील हे झोन गुगल मॅप्सवर आणण्याची किमया केली आहे ती एका मुंबईतीलच अर्बन डिझायनरने. युजर्सना आपल्या परिसरातील मॅप्सचा एक्सेस यामाध्यमातून करता येणार आहे. आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनही हे मॅप्स एक्सेस करता येणार आहेत. युजर्सना shorturl.at/tWX29 या लिंकवरून मॅपचा एक्सेस करता येईल.

एखाद्या झोनमध्ये कोरोना पॉझिटीव्ह पेशंट आढळला असेल तर त्या जागेचा समावेश हा कंटेनमेंट झोनमध्ये गुगल मॅपवर करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्ताचे राहते ठिकाण हे क्लस्टर झोन म्हणून शोधणे या माध्यमातून शक्य होते. त्या इमारतीच्या किंवा घराच्या शेजारच्या चार ते पाच इमारतीही या झोनमध्ये समाविष्ट होतात. लोकसंख्येवर आधारीतही हे गुणोत्तर आहे. जितकी जास्त लोकसंख्येची घनता तितका जास्त कंटेनमेंट झोनचा व्यास असे चित्र सध्या गुगल मॅपवर दिसते. मुंबई महापालिकेने शहरातले एकुण २४१ कंटेनमेंट झोन शोधले आहेत. व्हिडिओ एनेलिटिक्सच्या माध्यमातून या भागातील हालचाल सध्या मुंबई महापालिका ट्रॅक करत आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण संपुर्ण राज्यात आढळले आहेत.

- Advertisement -

गुगल मॅपवर सहज सोप्या पद्धतीने नागरिकांना ही माहिती मिळणे हे मॅपचे उदिष्ट आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून कोणते झोन हे अत्यावश्यक गोष्टी आणताना जाण्यासाठी प्रतिबंधित आहेत ही माहिती या मॅपच्या माध्यमातून मिळते. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन एनव्हायरमेंट इम्प्रुव्हमेंट सोसायटीचे अभिजित एकबोटे यांनी हा मॅप डिझाईन केला आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीच्या आधारावर हा मॅप वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहे. यापुढच्या काळात मुंबई महानगर क्षेत्राचा समावेश या मॅपमध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -