घरCORONA UPDATEलिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांचा कोरोनाने मृत्यू

लिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जगभरात कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सर्वसामान्यांसह खास व्यक्तींचाही बळी जात आहेत. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा लिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल (वय ६८) यांचं निधन झालं. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महमूद जिब्रिल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं होतं. हॉस्पिटल डायरेक्टर हिशाम वागडी यांनी रविवारी दुपारी २ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. २१ मार्च रोजी त्यांना गांझौरी स्पेशलाइज्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी प्रकृतीत त्यांच्या बदल होत होता मात्र, अचानक पुन्हा त्यांची प्रकृती खराब झाली. श्वास घेण्यात त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जिब्रिल हे लिबियन उदारमतवादी पक्षांचे गठबंधन करणार्‍या नॅशनल फोर्सेस अलायन्सचे प्रमुख होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा – देशाच्या काही भागात कोरोना तीसऱ्या टप्प्यात; एम्सच्या डॉक्टरांनी केली चिंता व्यक्त

दरम्यान, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जॉन्सनच्या कार्यालयाने ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत: ला १०, डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानी क्वारंटाईन करुन घेतलं होतं. १० दिवस होऊन गेली तरी देखील लक्षणं दिसत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू ब्रिटनमधील राजघराण्यापर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान जॉन्सनपूर्वी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -