घरमहाराष्ट्रआकाशाचा मंडप, कल्पवृक्षाची साक्ष, आनंदवनात लग्नसोहळ्याला निसर्गाच वऱ्हाड

आकाशाचा मंडप, कल्पवृक्षाची साक्ष, आनंदवनात लग्नसोहळ्याला निसर्गाच वऱ्हाड

Subscribe

सर्व गोंगाटाच्या पलिकडे, केवळ नीरव शांततेमध्ये, मोकळ्या आकाशाच्या मंडपाखाली, झाड, वेली, पशु, पक्षी यांच्यासोबत, पानांच्या हारांनी, झेंडुच्या तोरणांनी आणि ते ही सुर्य मावळतानाच्या कातरवेळेच्या ब्रम्हमुहुर्तावर निसर्गाशी एकरूप होऊन एक आगळावेगळा लग्नसोहळा नुकताच आनंदवनाने अनुभवला.

आनंदवनमध्ये नुकताच हृदयाच्या भावनांची नाती सांगणारा विवाह-सोहळा पार पडला. गोव्याचे प्राध्यापक प्रमोद पवार व शुभांगी राठोड या दोघांनी निसर्गाला साक्षी ठेऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. काळाची पावले ओळखुन निसर्ग हाच आपला मायबाप आहे, त्यालाच आपण स्मरण करून नविन आयुष्याची सुरुवात करावी असा या दोघांचा विचार होता. कोणत्याही खर्चाशिवाय केवळ आनंददायी विचारांनी पार पडलेल्या, या लग्न सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा नकळत ओल्या केल्या आणि खऱ्या अर्थी मने जिंकली. एवढी भावनिकता या सोहळ्याने अनुभवली. प्रवेशद्वाराजवळच अलगदपणे फुलांचा झालेला वर्षाव. निसर्गस्वरांनी एकमेकांचा हात धरून झालेला प्रवेशानंतर कल्पवृक्षाजवळ दीपप्रज्वलनाने या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. कल्पवृक्षाच्या साक्षीने एकमेकांच्या गळ्यात पानांचा हार घालून त्याच्याच भोवती सात फेरे घेण्यात आले. कल्पवृक्षाच्या पानांना स्पर्श करून , डोळे मिटुन मनात केलेला संकल्प पुर्ण झाल्याची भावना या जोडप्याच्य मनात होती. वृक्षलागवड करून निसर्गऋण व्यक्त करण्यात आले. समारोपाला नवदाम्पत्यांनी फुगडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी होती. खरच आनंद किती लहान-लहान गोष्टीमध्ये दडलेला असतो याचा अनुभव या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांना घेता आला. प्रा. प्रमोद व मॅडम शुभांगी यांना नविन आयुष्यासाठी निसर्गरुपी होऊन सर्वांनाच एक चांगला आनंद दिली. सोहळा खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी शिवाजीदादा, प्रियंका ताई, अमोल , दिनेश आणि प्रभाकर गुरूजींमुळे यांचीही मेहनत तितकीच मोलाची होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -