घरमहाराष्ट्रलोकसभेचा पेढा आम्हीच तुम्हाला भरवू, मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना उत्तर

लोकसभेचा पेढा आम्हीच तुम्हाला भरवू, मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना उत्तर

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी उत्तर दिले आहे.

“राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची, झेलण्याची आणि परतून लावण्याची ताकद आणि धमक शरद पवार यांच्यात आहे. सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या पवार यांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही. शरद पवार उमेदवार नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माढाही जिंकू व उर्वरित महाराष्ट्रही. आणि हो आमच्या विजयाचा पेढाही तुम्हाला घरपोच वर्षावर येऊन भरवू.” अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची माघार म्हणजे युतीचा मोठा विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी युतीचा ‘फुसका वारा’ म्हणत टीका केली.

मुंडेंनी दिले हे आव्हान 

२३ मे नंतर देशातल्या निकालाने तुमचे तोंड कडू पडणार आहे त्यावेळी तुम्हाला तोंड गोड करायला पेढा लागणारच आहे असल्याचा टोला लगावतांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज आनंद व्यक्त करण्यापेक्षा माढयाच्या निवडणूक रिंगणात उतरावे असे आव्हानही मुंडे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -