घरमहाराष्ट्रडहाणू, तलासरीत पुन्हा भूकंपाचे धक्के

डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंपाचे धक्के

Subscribe

१ डिसेंबरनंतर अवघ्या ५ दिवसात पुन्हा एकदा दुसरा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे या तालुक्यामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थ रात्रभर घराबाहेर झोपतात. एकतर राज्यभरामध्ये थंडी पडायला हळूहळू सुरुवात झाली आहे. अशात संपूर्ण रात्री ते कडाक्याच्या थंडीत काढतात.

डहाणू, तलासरी पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. आज पहाटे ६.१५ मिनिटाने पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले. गेल्या काही दिवसापासून एकापाठी एक भूकंपाचे सत्र सुरु असल्यामुळे डहाणू आणि तलासरीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिन्यापासून या भागामध्ये भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे ग्रामस्थ कडाक्याच्या थंडीतही घराबाहेर झोपत आहे. तर काही ग्रामस्थांनी भीतीपोटी गावं सोडून दिली आहेत.

भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरले

गेल्या दोन महिन्यापासून तलासरी आणि डहाणू तालुक्यात भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूकंपाच्या धक्यामुळे त्यांच्या घराला तडे गेले आहेत घरांचे नुकसान झाले आहे. रात्री अपरात्री केव्हाही भूकंप येऊ शकतो त्यामुळे याठिकाणचे ग्रामस्थ रात्रभर झोपत नाहीत. १ डिसेंबरनंतर अवघ्या ५ दिवसात पुन्हा एकदा दुसरा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे या तालुक्यामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थ रात्रभर घराबाहेर झोपतात. एकतर राज्यभरामध्ये थंडी पडायला हळूहळू सुरुवात झाली आहे. अशा थंडीमध्ये देखील हे नागरिक भूंकपाचा धक्क्याच्या भीतीने घराबाहेर झोपत आहेत.

- Advertisement -

अनेकांनी केले स्तलांतर

लागोपाठ भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सावधानता बाळगली जात आहे. या भूकंपाच्या धक्क्यामध्ये यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेकांच्या घराला तडे जाऊन घरांचे, शासकीय इमारतीचे नुकासान झाले आहे. भूकंपाच्या धक्क्याची भीती मनात ठेवत अनेकांनी गावं सोडून दुसरीकडे स्थलांतर केले आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

भूकंपाच्या भीतीने थंडीतही झोपतात घराबाहेर

डहाणू परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -