निवडणूक आयोगाचे महागडे दरपत्रक; वडापाव १५, मटण थाळी २४० रुपये

केंद्रीय निवडणूक आयोगाने दरपत्र जारी केले असून हे सर्वात महागडे दरपत्रक असल्याचे समोर आले आहे.

Maharashtra
election 2019 commissions expensive rate sheet
निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये ठरवली आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेने उमेदवारांसाठी जारी केलेल्या दरपत्रकातील खाद्यपदार्थाचे दर हे बाजाराभावापेक्षा अधिक आहेत. निवडणूक आयोगाचे महागडे दरपत्रक जारी करण्यात आले असून यामध्ये वडापाव १५ तर बिर्याणी थाळी २०५ रुपये असून मटण थाळी २४० रुपये आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारापुढे यंदाच्या निवडणुकीत खर्चमर्यादा पालनाचे आव्हान आहे.

निवडणूक आयोगाचे दरपत्र

निवडणूक आयोगाने वडापावसाठी प्रतिनग १५ रुपये, तर पोहे ३० रुपये, तर साधा चहा ८ रुपये आणि मटण थाळीवर कार्यकर्त्यांनी ताव मारल्यास त्यासाठी २४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर बिर्याणी प्लेटसाठी २०५ रुपये तर शाकाहारी थाळीसाठी ११५ रुपये दर उमेदवारांना मोजावा लागणार आहे. या दरानुसारच उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत अशी सर्वच निवडणुकांसाठी आयोग दरपत्रक जाहीर करत असते. या दरपत्रकात टाचणीपासून ते सभेच्या मंडपापर्यंत आणि चहापासून ते शाकाहारी आणि सामिष जेवणापर्यंतच्या सर्वच गोष्टींचा समावेश असतो.

लोकसभा निवडणूक दरपत्रकानुसार

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक खर्चाचे दरपत्रक निश्चित केले जातात. या दरपत्रकाप्रमाणेच उमेदवारांना आपल्या खर्चाचा तपशील देणे बंधनकारक आहे. उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाखापर्यंत ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक दरपत्रक निश्चित करण्यात आले आहेत.

  • वडापाव आणि पॅटीस – १५ रुपये
  • पोहे आणि उपमा – ३० रुपये
  • साधा चहा – १५ रुपये
  • स्पेशल चहा – १५ रुपये
  • शाकाहारी थाळी – ११५ रुपये
  • स्पेशल शाकाहारी थाळी – १८० रुपये
  • अंडाकरी थाळी – ९० रुपये
  • मटण, चिकन, मच्छी थाळी – २५० रुपये
  • १ लिटर पाण्याची बाटली – १७ रुपये
  • शीतपेय – २० रुपये

निवडणुकी दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भाड्याने वापारण्यात येणाऱ्या गाड्यांचे दर ठरवले गेले आहेत. टोपी ८५ रुपये, टी – शर्ट प्रतिनग १३५ रुपये, शालीचे दर १०५ ते ८०० रुपयापर्यंत आहेत. तर मंडप, खुर्च्या, हारतुऱ्यांपासून फटाक्यांपर्यंत दरांचाही त्यात समावेश आहे. तर एक हजार फटाक्यांची माळा ७५० रुपयांनी खरेदी करावी लागणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना फिरण्यासाठी जीप, बोलोरे, टाटा सुमो, इनोव्हा, फोर्ड आयकॉन, स्कोडा, होंडासिटी या वाहनांच्या दराबरोबरच प्रचार सभांसाठी चौरस फुटनिहाय व्यासपीठ, मंडप, मॅटिंग, खुर्ची, कुशन खुर्ची, टयुबलाईट, टेबल, सोफासेट, कुलर, फॅन यांचे नगनिहाय, ध्वनिक्षेपक, माईक, अॅम्प्लीफायर यांचेही दर निश्चित केले आहे.

हे आहेत इतर

शुद्ध शाकाहरी थाळी आणि स्पेशल थाळीसाठी स्वतंत्र दर आहेत. शिवाय भजी, भेळ आणि ढोकळा २० रुपये प्लेट, समोसा आणि कचोरी २५ रुपये, प्रचारासाठी रिक्षा ध्वनिक्षेपकासह १ हजार ९०० रुपये, राऊंड बुके १०० रुपये, ट्रॅगल बुके १५० रुपये, व्हीआयपी बुके ३५० रुपये, मोठा हार ३ ते ५ हजर रुपये, बास्केट बुके ३०० रुपये, क्रॅकर फटाका ७५० रुपये. निवडणुकीसाठी उमेदवाराच्या कार्यलयात वापरण्यात येणाऱ्या टाचणीपासून प्रचारात वापरण्यात येणाऱ्या ट्रकपर्यंतच्या खर्चाचा हिशोब दरपत्रकाप्रमाणे द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे ढोल वादन पथक, पोवाडे, पथनाट्य पथकाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. पोवाडा पथकाला आणि पथनाट्य पथकाला ५ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.


वाचा – लोकसभा निवडणुकीनंतर गणेश नाईक शिवसेनेत?


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here