घरCORONA UPDATEस्वॅब टेस्ट करुन दिले बनावट कोरोना रिपोर्ट, मुंबइतील धक्कादायक प्रकार

स्वॅब टेस्ट करुन दिले बनावट कोरोना रिपोर्ट, मुंबइतील धक्कादायक प्रकार

Subscribe

आरोपी अब्दुल गफ्फर शेख पैशांसाठी स्वॅब टेस्ट करून दिले बनावट कोरोना रिपोर्ट

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणीक वाडत आहेत. त्यात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल गफ्फर शेख असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी अब्दुल गफ्फर शेख वडाळा येथील रुग्णालयात तंत्रज्ञ (technician) म्हणून काम करत होता. दहा दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयात नोकरी मिळाली होती. त्याच्याकडे संशयित रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्याचीही जबाबदारी होती.

मेहर लांबेराज यांची यांच्या आईला कॅन्सर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करायचं होतं. मात्र कोरोनाची चाचणी न केल्यामुळे त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल करुन घेत नव्हते. यामुळे मेहर यांनी शेख यांच्याशी संपर्क करत आईची कोरोनाची चाचणी करायला घरी बोलावलं. शेख मेहर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची स्वॅब टेस्ट केली. या टेस्टचे तब्बल ६ हजार रुपयेही घेतले. मात्र शेखने कोरोना रिपोर्ट आणून दिला नाही. मेहर यांनी शेखशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर शेखने मेहर यांच्या आईचे रिपोर्ट त्यांच्या काकांकडे सुपर्द केले. मात्र त्या रिपोर्टमध्ये पूर्ण माहिती नसल्याचे मेहर यांच्या लक्षात आलं.

- Advertisement -

हेही वाचा – जागतिक पर्यावरण दिन: पर्यावरणात समतोल राखणे काळाची गरज


मेहर यांनी लॅबमध्ये चौकशी केली. त्यानंतर त्यांना कळालं की, त्यांच्या आईच्या स्वॅब टेस्टचे नमुने लॅबमध्ये पोहचलेच नाही. त्यानंतर मेहर यांनी ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये अब्दुल गफ्फर शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शेखला अटक केल्यानंतर शेखने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी शेखची चौकशी केल्यानंतर पैशांसाठी त्याने असं केल्याचं समोर आलं. पगार जास्त मिळत नसल्यानं दोन वेळचं अन्नही मिळत नाही आहे. पैशांसाठी त्याने असा प्रकार केल्याचं सांगितलं. शेखने आणखी किती जणांचे असे बनावट रिपोर्ट केले आहेत का, याची चौकशी पोलीस करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -