Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर महाराष्ट्र पाच वर्षीय मुलीबरोबर बापाचे लौंगिक चाळे; गुन्हा दाखल

पाच वर्षीय मुलीबरोबर बापाचे लौंगिक चाळे; गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक चाळे केल्याची घटना घडली आहे.

Pimpari-chinchwad
अत्याचार

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक चाळे केल्याची घटना घडली आहे. या घटने प्रकरणी २८ वर्षीय महिलेने पती विरोधात हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार नराधमाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर संबंधित धक्कादायक घटना समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय फिर्यादी आणि ३० वर्षीय नराधम हे पती-पत्नी आहेत. त्यांना पाच वर्षीय मुलगी आहे. फिर्यादी यांनी पाच वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी पाच वर्षीय मुलीची लघवीची जागा मोठी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. तेव्हा, फिर्यादी यांनी पाच वर्षीय मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने वडिलाचे नाव घेतले. यामुळे फिर्यादी या घाबरल्या होत्या.

दरम्यान, रात्री सर्व कुटुंब एकत्र झोपले असता पतीच्या हालचालींवर पत्नीने लक्ष ठेवण्यासाठी झोपेचे सोंग घेतले. त्यावेळी पतीने उठून पाच वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे करत असताना पतीला समक्ष पकडले. याचा जाब विचारल्यानंतर आरोपी पतीने पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आज हिंजवडी पोलिसात संबंधित घटनेबद्दल पत्नीने पती विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या करत आहेत.

हेही वाचा –

Live – महाराष्ट्रातील राजकीय नाट्य कुठल्या वळणावर