पुणे: कॅन्टोन्मेंट रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग

Fire in ICU of Cantonment Hospital in pune
पुणे: कॅन्टोन्मेंट रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग

पुण्यातील गोळीबार मैदानाजवळ असलेल्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयातील (Cantonment Hospital) आयसीयूमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या घटनास्थळी तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

माहितीनुसार, पुण्यातील या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. काही वेळापूर्वीच या रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागली. या आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आयसीयूमध्ये आग लागल्याचे कळल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णालया बाहेर आले आहेत. पण या रुग्णालयात नेमके किती रुग्ण आहेत याबाबत माहिती अस्पष्ट आहे. तसेच एसीमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – कल्याणमध्ये गणेशोत्सवात एकत्र आलेले ३२ जण कोरोनाबाधित!