घरमहाराष्ट्र'भिलार' प्रमाणे ठाणे जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभं करणार

‘भिलार’ प्रमाणे ठाणे जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभं करणार

Subscribe

सातारा जिल्ह्यातील 'भिलार' प्रमाणे ठाणे जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ठाण्यातील दुर्मिळ वस्तूंच्या संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील ‘भिलार’ प्रमाणे ठाणे जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ठाण्यातील दुर्मिळ वस्तूंच्या संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली. मराठी ग्रंथसंग्रहालयात राज्यातील प्रथमच दुर्मिळ ग्रंथांच प्रदर्शन भरविण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ठाणे आणि मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थांच्या सहकार्याने आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत ठाणे ग्रंथोत्सोव २०१० चे उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी बोलत होते.

फ्लायओव्हर, मेट्रो ही विकासाची कासातारा जिल्ह्यातील ‘भिलार’ प्रमाणे ठाणे जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ठाण्यातील दुर्मिळ वस्तूंच्या संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली.मे म्हणजे ठाण्याचे इंद्रिय आहेत. पण ग्रंथसंग्रहालयासारख्या वास्तु या ठाण्याचा आत्मा आहेत. या वास्तूंमुळे ठाणेकर रहिवाशांना सांस्कृतिक भान मिळत आहे. इतर शहरातही इंद्रियांची वाढ होते पण ठाण्यात इंद्रियांबरोबर आत्म्याची वाढ होताना दिसते आहे. ठाणेकर रहिवासी म्हणून विद्यार्थी दशेपासून ग्रंथसंग्रहालयात येत होतो दादोजी कोंडदेव स्टेडियममधील साहित्य संमेलनाला उपस्थित राहिलो पण तेव्हा ग्रंथ विकत घेण्याची परिस्थिती नव्हती आता या वास्तूत येऊन ग्रंथ विकत घेण्याची परिस्थिती निर्माण झालीय. आज तरुणांमध्ये वाचनाचे प्रमाण सकृतदर्शनी दिसत नसले तरी मोबाईल, आयपॅड, ई-बुकच्या माध्यमातून आवड वाढलेली दिसतेय. यामुळे तरुणांना पुन्हा एकदा वाचनाच्या गरजेकडे ओढण्यासाठी, जुन्या पध्दतीने नविन पध्दतीने पुस्तकांचा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी सातारा जिल्ह्यातील “भिलार” प्रमाणे ठाण्यात पुस्तकांचे गाव निर्माण करण्याचा प्रयत्न डीपीडीसी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

- Advertisement -

पावसाळा संपला की नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात साहित्य उत्सव साजरा होत असतो. यानुसारच ठाणे जिल्ह्यात ग्रंथोत्सोव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सोवाच्या निमित्ताने राज्यात प्रथमच दुर्मिळ ग्रंथांच प्रदर्शनाचही आयोजन करण्यात आला आहे. या दुर्मिळ ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील परंपरा, संस्कृती जपण्यात आली आहे. ठाण्यातील दुर्मिळ ग्रंथांच डिजिटलायझशनव्दारे जतन करण्याचा प्रयत्न होत आहेच पण याचबरोबर ठाण्यातील दुर्मिळ वस्तूंच्या जतनासाठी मुंबईच्या “प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम”च्या धर्तीवर वस्तू संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी “ग्रंथांनी मला काय दिले”, या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे म्हणाले की, लौकिक अर्थाने ग्रंथांशी आपल्या आयुष्याची सुरुवात बाराखडीच्या पुस्तकापासून ते ज्ञानकोशांपर्यंत जाते. ग्रंथ आपल्या सोबत वाढतात, प्रवास करतात, आपल्याशी बोलतात. मौखिक परंपरेतुन लिखितापर्यंत झालेला ग्रंथांचा प्रवास आपल्याला समृद्ध करत जातो.

- Advertisement -

तर साहित्यिक कृ. ज. दिवेकर यांनी फक्त वाचन न करता लिहिण्याचाही प्रयत्न करा असा सल्ला दिला. विज्ञान लेखक अ. पा. देशपांडे म्हणाले की, ग्रंथांमुळे भाषा सुधारते. वैचारिक पातळी सुधारते. चरित्र वाचनामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. तर प्रसिद्ध सूत्रसंचालिका वासंती वर्तक म्हणाल्या की, ‘चांगल जगायला, चांगल व्यक्त व्हायला, चांगल माणूस व्हायला ग्रंथ शिकवितात.’

या परिसंवादाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक अ. पा. देशपांडे होते. यानंतर अशोक बागवे, राजीव जोशी, सतीश सोळांकुरकर, भगवान निळे, साहेबराव ठाणगे, आदित्य दवणे, वृषाली विनायक, नितल वढावकर, संकेत म्हात्रे यांनी “काव्य संमेलन” गाजविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश आकेरकर यांनी केले. यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह अनिल ठाणेकर, महादेव गायकवाड, संजीव चुंबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -