प्लॅन फसला! भाजी विक्रीच्या आडून गुटखा विक्री; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजीची विक्री करत असल्याचे भासवून टेम्पो मधून तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार पालघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

gutka worth rs 14 lakh seized travels
भाजी विक्रीच्या आडून गुटखा विक्री; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजीची विक्री करत असल्याचे भासवून टेम्पो मधून तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार पालघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यात आरोपींना पालघर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून टेम्पो सह
एकूण १४ लाख ९० हजार ७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघरने केली आहे.

गुजरात राज्यातून मुंबई दिशेने एक पांढरा रंगाचा टेम्पो वाहतूक करत आल्याची गुप्त माहिती पालघर पोलिसांना मिळाली. यात मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील मनोर जवळ येथे सापळा रचून टेम्पोची तपासाणी करून भाजी भरलेली दिसली. मात्र, त्या भाजीच्या आतमध्ये विमल पान मसाला, शुद्ध प्लस, रजनीगंधा असा ८ लाख ५ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. तर टेम्पोसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी मुंबईतील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या राष्ट्रीय महमार्गावर तंबाखू जन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती लागतच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.


हेही वाचा – Corona: राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक