घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींचं खळबळजनक विधान

महाराष्ट्रात आम्ही ‘डिसीजन मेकर’ नाही; राहुल गांधींचं खळबळजनक विधान

Subscribe

राज्यात गेले दोन दिवस राजकीय घडामोडी होत असताना राहुल गांधी यांनी आज खळबळजनक विधान केलं आहे.

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी खळबळ उडवून देणारं विधान केलं. आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. आम्ही या सरकारमधील ‘डिसीजन मेकर’ नाही,” असं विधान राहुल गांधी यांनी केलं. यापूर्वी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, “मी मंत्रिमंडळात नाही. सरकार पण आमचं नाही. हे सरकार शिवसेनेचं आहे,” असं चव्हाण यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आता राहुल गांधींनी देखील तसाच सुर धरला आहे. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत असा प्रश्न विचारण्यात आला की देशातील एक तृतियांश कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात. मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्रात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असं वाटतं का? कारण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, आपल्याला असं दिसून येईल की देशातील दिल्ली, मुंबई आणि पुणे यासारख्या मोस्ट कनेक्टेड शहरांमध्येच कोरोना वाढत आहे. मी आपल्याला एक फरक सांगू इच्छितो, की आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. मात्र, आम्ही सरकारमधील ‘डिसिजन मेकर’ नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पुदुच्चेरी या राज्यातील सरकारमध्ये डिसिजन मेकर आहोत. हा सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा असणे यामधील हा फरक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे सरकारला धोका नाही; काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या पाठिशी – शरद पवार


दरम्यान, महाराष्ट्र त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे संघर्ष करत आहे. मुंबई एक आर्थिक दृष्ट्या महत्वाचं शहर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करायला हवं. महाराष्ट्र सध्या एक अत्यंत कठीण लढाई लढत आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण सहकार्य करणं गरजेचं आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -