रेल्वे प्रवासात प्रवाशांना मिळणार ‘मसाज’ची सुविधा

आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून मसाजची सुविधा देखील रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Maharashtra
Indian railways provide massage service in trains
आता रेल्वेत मसाज सुविधा

लांब पल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनान सतत वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देत असते. धावत्या ट्रेनमध्ये हॉटेलसारखे जेवण असतो किंवा इंटरनेटच्या सुविधा असो. यातच आता रेल्वे प्रशासनाने एक नवीन सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे. ती म्हणजे आता लांब पल्ल्याच्या धावत्या ट्रेनमध्ये मसाज करून घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, ही खास सुविधा खासकरुन इंदूरहून सुटणाऱ्या ३९ ट्रेनमध्ये असणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागातील विभागीय व्यस्थापक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून दिली आहे. मात्र, प्रवाशांनी या सुविधेचे स्वागत न करता, उलट ज्या सुविधा देत आहेत. त्याच सुविधा व्यवस्थिती आणि नीट देण्याच्या सूचना प्रवाशांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

प्रवाशांनी केले रेल्वे प्रशासनाला ट्रोल

रेल्वे प्रवाशांना पाहिजे त्या सुविधा रेल्वे प्रशासनाला देणे जमत नाही. मात्र, अनावश्यक सुविधा देण्याचे जणू सत्र रेल्वे विभागाने सुरु केले आहे. प्रवाशांना रेल्वे प्रवासात सीट मिळत नाही. परिणामी रेल्वेच्या शौचालय जवळ बसून प्रवास करावे लागते. अनेकदा रेल्वे वेळेत धावत नाही. खूप आरडाओरडा करून सुद्धा प्रवाशांचे ऐकून कोणही घेत नाही. मात्र, रेल्वे प्रशासन सोईसुविधांसाठी सदैव पुढाकार घेण्याचा आव आणत आहेत.

ट्विटरवरून दिली माहिती

पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागातील विभागीय व्यस्थापक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक पोस्ट टाकली. या पोस्ट मध्ये रेल्वे प्रवाशांना प्रवास दरम्यान, मसाज करून घेण्याची सुविधा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही सुविधा खासकरुन इंदौरहून सुटणाऱ्या ३९ ट्रेनमध्ये दिली जाणार असून या सेवेसाठी १०० रुपये प्रवाशाला मोजावे लागणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या या ट्विटरला रेल्वे प्रवाशांनी ट्रोल केले आहे. ज्यात अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट बंद, तर काही प्रवाशांनी विभागीय व्यस्थापक यांना जनरल डब्यातून प्रवास करण्याची विनंती केली. मात्र, या मसाज सुविधेचे कोणीही स्वागत केलेले नाही.

कसा मिळणार मसाज?

न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) मार्फत लायसन्स आफ अग्रिमेंट (एलओए) जारी केले आहे. दरम्यान, देशातील विविध भागात इंदोरहून सुटणाऱ्या ३९ ट्रेनमध्ये ही मसाज सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी प्रत्येक गाडीत दोन अनुभवी व्यक्ती असणार आहे. तसेच, या सेवेसाठी १०० रुपये प्रवाशाला मोजावे लागणार आहेत. प्रवासी या सेवेचा फायदा सकाळी सहा ते रात्री दहावाजेपर्यंत घेऊ शकणार आहेत. तसेच, या व्यक्तींचे फोन नंबर टीटीई आणि कोचमध्ये उपलब्ध करणार असून ज्यावेळी गरज असेल, त्याचवेळी प्रवासी फोन करुन मसाज करणाऱ्या व्यक्तीला बोलवू शकतो. हे यशस्वी झाले तर कालांतराने उज्जन, रतलामहून सुटणाऱ्या गाड्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.


हेही वाचा – रेल्वे प्रवासामुळे शरीरासह मानसिक ताणही वाढतोय

हेही वाचा – रेल्वे प्रवासातील ‘ती’ ३० सेकंद महत्त्वाची