घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

Subscribe

सिन्नर तालुक्यातील पाडळी शिवारातील चांभार घाट परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

सिन्नर तालुक्यातील पाडळी शिवारातील चांभार घाट परिसरात काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार दिवसांपूर्वी येथील चंद्रभान दामोधर जाधव यांच्या वस्तीवरील शेळीवर हल्ला करून बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता. याप्रकरणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने ५ नोव्हेंबर रोजी सकाळी चांभार घाट परिसरात सुकदेव रेगवडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजर्‍यात अनिल दामोधर जाधव यांच्या मालकीचा बोकड ठेवला होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी ७ ला बोकडाच्या लालसेने आलेला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

बिबट्याने मंगळवारी रात्री प्रकाश शिंदे यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला होता. तसेच, सायंकाळी त्यांनी टोमॅटोच्या शेतात बिबट्या पाहिला होता. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक किरण गोर्डे, गोरख पाटील यांनी पिंजर्‍यासह बिबट्याला घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा पिंजरा पिकअपमध्ये टाकून मोहदरी वनउद्यानात आणण्यात आला. यावेळी योगेश रेवगडे, चंद्रभान जाधव, अनिल जाधव, पोपट रेवगडे, किशोर शिंदे, हिवरे येथील वन कर्मचारी सखाराम मेंगाळ आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

- Advertisement -

भितीने बोकडाचा मृत्यू

दरम्यान, बिबट्यासाठी खाद्य म्हणून पिंजर्‍यात ठेवलेल्या बोकडाचा बिबट्याच्या डरकाळ्यांनी घाबरल्यामुळे मृत्यू झाल्याचे अनिल जाधव यांनी सांगितले. तथापि, बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हा बिबट्या नर जातीचा असून चार साडे चार वर्षाचा असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -