घरमहाराष्ट्र'लिज्जत'ने महिलांना स्वाभिमानाने जगायला शिकवले - प्रकाश जावडेकर

‘लिज्जत’ने महिलांना स्वाभिमानाने जगायला शिकवले – प्रकाश जावडेकर

Subscribe

महिलांमध्ये सातत्य, चिकाटी, वात्सल्य, शिस्त आणि स्वाभिमान दडलेला असतो. त्यांच्यातील अंगभूत कौशल्य ओळखून 'लिज्जत' परिवाराने त्यांना एक ओळख बनवून दिली आणि स्वावलंबी बनवले असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेच्या सुवर्णमहोत्सववेळी केले आहे.

महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी बचत गटांची सुरुवात अलीकडच्या काळात करण्यात आली आहे . परंतु, लिज्जत पापडने पन्नास वर्षांपूर्वी महिलांचे संघटन करीत त्यांना स्वयंपूर्ण बनवले आहे. आज ५० हजार महिला स्वाभिमानाने पापड लाटण्याचा व्यवसाय करीत आहेत. ‘लिज्जत’ने या गरीब महिलांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेच्या सुवर्णमहोत्सववेळी केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ‘लिज्जत रत्न’ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले.

पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, ‘लिज्जत पापड’च्या संस्थापिका जसवंती बेन, अध्यक्षा स्वाती पराडकर, उपाध्यक्षा प्रतिभा सावंत, संचालक सुरेश कोते, संचालिका सुमन दरेकर, कमल कोळगे, विमल कांबळे, रत्नमाला जाधव, मंदाकिनी दाखवे, चेतना नहार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

या ‘लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरवले

या कार्यक्रमात दि महाराष्ट्र राज्य अर्बन को. ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साहित्यिका डॉ. मनिषा पोतदार, ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर, कर्नल हेमंत दरेकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल देशमुख, ‘भोई प्रतिष्ठान’चे डॉ. मिलिंद भोई, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे सचिन ईटकर, पत्रकार अलका धूपकर आणि हालिमा कुरेशी यांना ‘लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्वयंरोजगारातून विकास साधलेल्या या महिला आहेत. त्यांच्या मेहनतीला सलाम करावा वाटतो. सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. त्याचा सामना करण्यासाठी महिलांची मदत होऊ शकते. ५० हजारांना महिला एकत्रितपणे चांगले काम उभारू शकतात, हे लिज्जत पापडने दाखवून दिले आहे.  – सुभाष देशमुख, सहकार पणन मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -