घरमहाराष्ट्रओमराजे निंबाळकर यांच्यावरील हल्ल्यामागे स्थानिक राजकारण?

ओमराजे निंबाळकर यांच्यावरील हल्ल्यामागे स्थानिक राजकारण?

Subscribe

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर झालेला हल्ला हा जिलह्यातील स्थानिक राजकारणामुळे झाला असल्याची चर्चा आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भर प्रचारात चाकू हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या हल्ल्यामागे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा तरुण हल्ल्यानंतर फरार झाला होता. मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. टेकाळे हा भाजपचा कट्टर कार्यकर्ता असून गेल्या काही दिवसांपासून तो ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट टाकत होता. विधानसभेसाठी भाजप-सेना युती झाल्यानंतर निंबाळकर यांनी युतीविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळेच अजिंक्य टेकाळे नाराज होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर कुटुंबियांत गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. आतापर्यंत पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीत असल्यामुळे हा संघर्ष उघड उघड दिसत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच राणाजगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून उस्मानाबादसाठी उमेदवारीही मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही नेत्यांना युती धर्म पाळावा लागणार हे निश्चितच होते. मात्र ओमराजे यांनी युती धर्म पाळणार नाही अशी भूमिका घेतली होती.

- Advertisement -

लोकसभेच्या वेळी अंजिक्य टेकाळेच्या फेसबुक पोस्ट

 

Ajinkya Tekale fb post

- Advertisement -

हल्लेखोर अजिंक्य टेकाळेने लोकसभा निवडणुकीवेळी युतीचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता. ओमराजे यांच्यासाठी टेकाळेने फेसबुकवर राणाजगजितसिंह यांच्याविरोधात देखील पोस्ट टाकल्या होत्या. लोकसभेनंतर राणाजगजितसिंह भाजपात आल्यामुळे जिल्ह्यातून भाजपचा आमदार निवडून यावा यासाठी अजिंक्य कामाला लागल्याचे त्याच्या फेसबुक पोस्टवरुन दिसून येत होते. मात्र ओमराजे यांनी युतीच्या विरोधात वक्तव्ये केल्यामुळे अजिंक्य फेसबुकवर आक्रमक पोस्ट टाकत होता. टेकाळे सध्या पुण्याला नोकरीला आहे. काही दिवसांपूर्वीच तो आपल्या गावाकडे आला होता.

विधानसभा निवडणुकीवेळी टेकाळेच्या फेसबुक पोस्ट

 

Ajinkya tekale facebook post

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -