घरमहाराष्ट्रMaharashtra Gram Panchayat Election Results 2021: जेव्हा अरविंद केजरीवाल 'आप'ल्या भाषेत कौतुक...

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: जेव्हा अरविंद केजरीवाल ‘आप’ल्या भाषेत कौतुक करतात

Subscribe

लातूरच्या दापक्याळ ग्रामपंचायतीमध्ये 'आप'चा विजय

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपचे सातपैकी पाच उमेदवार विजयी झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी या विजयाची दखल घेत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी मराठीमध्ये ट्वीट करत सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. आपच्या उमेदवारांनी लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. राज्यातील निवडणूकीचे निकाल हाती येत आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी बहुमताने विजयी झाल्याचे दावे केले आहेत. यातच आपच्या ७ पैकी ५ उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

केजरीवालांचे मराठीत ट्विट

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या आपच्या उमेदवारांच अभिनंदन केले आहे. खास म्हणजे केजरीवाल यांनी मराठीमध्ये ट्विट केले आहे. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा तसेच जनतेची सेवा करा असे म्हणत सर्व उमेदवारांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -