जमावबंदीत लग्न, दोन पोलीस निलंबित

सावंगी बीटचे जमादार प्रशांत नावंदे व गोपनीय शाखेचे जमादार नंदकिशोर दांडगे या दोघांवर ही कारवाई झाली आहे.

फुलंब्री

सावंगी हर्सूल येथील आईसाहेब मंगल कार्यालयात रविवारी जमावबंदी आदेश लागू असताना देखील लग्न सोहळा पार पडल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी फुलंब्री पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सावंगी बीटचे जमादार प्रशांत नावंदे व गोपनीय शाखेचे जमादार नंदकिशोर दांडगे या दोघांवर ही कारवाई झाली आहे.

नावंदे व दांडगे यांनी विवाह सोहळ्याची माहिती वरिष्ठांना देऊन कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र, त्यात कुचाराई केल्याने दोघांना निलंबित केले आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्याचा सहायक उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार (वधू पिता), प्रल्हाद साळवे (वर पिता) आणि मंगल कार्यालय मालक सुखदेव रोडे या तिघांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here