घरमहाराष्ट्रमावळचे उमेदवार; बारणे - पार्थ पवार एकत्र तुकोबाच्या दर्शनाला

मावळचे उमेदवार; बारणे – पार्थ पवार एकत्र तुकोबाच्या दर्शनाला

Subscribe

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमण बीजोत्सव सोहळ्याचे लाखो वैष्णवांच्या साक्षीने हा उत्सव पार पडला. या उत्सवाच्या निमित्ताने तुकोबांच्या मंदिरात दोघांची भेट झाली.

मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार हे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमण बीजोत्सव सोहळ्याचे लाखो वैष्णवांच्या साक्षीने हा उत्सव पार पडला. या उत्सवाच्या निमित्ताने तुकोबांच्या मंदिरात दोघांची भेट झाली.

मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवारी श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार हे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात असे चित्र पाहायला मिळत नाही. परंतु, आज जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आज वैकुंठगमण सोहळा असल्याने दोन्ही उमेदवार देहूच्या तुकोबांच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ अजित पवार हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. यावेळी, श्रीरंग बारणे यांनी कोण पार्थ पवार असा प्रश्न उपस्थित केला होता. बारणे यांनी लगावलेला तोल जेव्हा पार्थ अजित पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पत्रकारांनी विचारला. त्यावेळी, श्रीरंग बारणे यांचे नाव न घेता,” मला विरोधी उमेद्वारांबद्दल काही बोलायचे नाही ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. मला फक्त काम करायचं आहे. त्यांना बोलण्यातून आनंद मिळत असेल तर त्यांनी बोलावे. मला फक्त काम करण्याचा आनंद मिळतो. माझा स्वतंत्र अजेंडा आहे.” असे पार्थ पवार म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -