घरमहा @४८३३ - मावळ लोकसभा मतदारसंघ

३३ – मावळ लोकसभा मतदारसंघ

Subscribe

मावळ लोकसभा मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे. मतदारसंघात तीन तालुके पुणे जिल्ह्यात तर तीन तालुके रायगड जिल्ह्यात आहेत. अर्धा शहरी तर अर्धा ग्रामीण भाग या मतदारसंघात आहे. २००८ च्या पुनर्रचनेनंतर या मतदारसंघाची निर्मिती झाली. पुण्यातील पिंपरी चिंचवड या तालुक्याने औद्योगिक, आयटी क्षेत्रात प्रगती केली आहे. तर मावळ तालुका भात शेतीसाठी ओळखला जातो. कर्जत, उरण आणि पनवेल असे रायगडमधील तीन तालुके आहेत. याच मतदारसंघात लोणावळा, खंडाळा अशी पर्यटनस्थळे येतात.

लोकसभा – २००९ निवडणुकीत एकूण १६ लाख ४ हजार ८८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ८ लाख ५० हजार ९७२ होती तर ७ लाख ५३ हजार ९१७ महिलांनी मतदान केले होते. २००९ साली शिवसेनेचे गजानन बाबर या मतदारसंघातून खासदार झाले होते. सध्या या मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देणार, अशी चर्चा असल्यामुळे मावळकडे कुतुहलाने पाहीले जात आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ३३

नाव – मावळ

- Advertisement -

संबंधित जिल्हे – रायगड आणि पुणे

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग, आयटी क्षेत्र

प्रमुख शेती पीक – भात आणि इतर


मतदारसंघ आरक्षण – खुला

एकूण मतदार – १९ लाख ५२ हजार २०८

महिला – ९ लाख १७ हजार ८९

पुरुष – १० लाख ३४ हजार ९०९


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

श्रीरंग बारणे – शिवसेना – ७ लाख २० हजार ६६३

पार्थ अजित पवार – राष्ट्रवादी काँग्रेस – ५ लाख ४ हजार ७५०

राजाराम नारायण पाटील – वंचित बहुजन आघाडी – ७५ हजार ९०४

नोटा – १५ हजार ७७९

अॅड. संजय किसन कानडे – बहुजन समाज पार्टी – १० हजार १९७


मावळ मधील विधानसभा मतदारसंघ

रायगड जिल्हा

१८८ पनवेल – प्रशांत ठाकूर, भाजप

१८९ कर्जत – सुरेश लाड, राष्ट्रवादी

१९० उरण – मनोहर भोईर, शिवसेना

पुणे जिल्हा

२०४ मावळ – संजय भेगडे, भाजप

२०५ चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप

२०६ पिंपरी (SC) – अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना


shrirang barne mp
श्रीरंग बारणे

विद्यमान खासदार – श्रीरंग बारणे, शिवसेना

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गजानन बाबर यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांना निवडणुकीचे तिकिट मिळाले. मागच्या चार वर्षात त्यांची लोकसभेतील उपस्थिती ९५ टक्के राहिली असून त्यांनी त्यांचाकडील १०० टक्के निधी विकासासाठी खर्च केला आहे. सध्या भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाईल, असा मतप्रवाह आहे. मात्र आता युती झाल्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी बारणे यांनी स्वतःच्या ‘शब्दवेध’ या संसदेतील भाषणाच्या पुस्तक प्रकाशनाला राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांना निमंत्रित केले होते. जर भाजपकडे हा मतदारसंघ गेला तर आझम पानसरे यांची मदत घेण्याचा त्यांचा उद्देश आहे.


२०१४ मधील मतांची आकडेवारी

श्रीरंग बारणे, शिवसेना – ५ लाख १२ हजार ३०

लक्ष्मण जगताप, शेकाप – ३ लाख ५४ हजार ७३०

राहुल नार्वेकर, राष्ट्रवादी – १ लाख ८२ हजार २३७

नोटा – ११ हजार १७८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -