घरताज्या घडामोडीनराधम काकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेची २४ दिवसांनी सुटका

नराधम काकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेची २४ दिवसांनी सुटका

Subscribe

जालना पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीच्या तिच्या नराधम काकांच्या तावडीतून २४ दिवसांनी सुटका केली आहे. ३२ वर्षीय नराधम काकाने मावशी आजारी असल्याचे कारण सांगून पीडित अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. चंदनझिरा पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातून पीडित तरुणीची सुटका केली आहे. तर आरोपीला औरंगाबद येथील बस स्टँडवरुन अटक केली.

अल्पवयीन मुलगी आपल्या घरातून १४ जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार देखील नोंदविण्यात आली होती. चंदझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्यामसुंदर कुथाळे या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी सर्व नातेवाईंकाच्या घरी चौकशी केली मात्र पीडितेचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तपासाच्या वेळी पीडित मुलीला काकांनी पळवून नेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र फोन बंद असल्यामुळे काका काही हाती लागत नव्हता. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला फोन करुन तिला परभणीला यायला सांगितले. मात्र आरोपी काका तिथे आलाच नाही.

- Advertisement -

त्यानंतर आरोपीने काही दिवसांनी पत्नीला औरंगाबाद येथे भेटायला बोलवले होते. यावेळी पोलिसांनी औरंगाबाद एसटी स्टँडवर सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी तावडीत घेतल्यानंतर अल्पवयीन मुलीला ज्याठिकाणी लपवून ठेवले होते. त्याचा पत्ता देखील आरोपीने सांगितला. त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील एका नातेवाईकाच्या घरातून पीडित मुलीची सुटका करण्यात आली. काकाने आपल्याला खोलीत बंद करुन लैंगिक अत्याचार केले असल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने सुटका झाल्यानंतर दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -