पुण्यात विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना धक्काबुक्की

त्यामुळे विसर्जन मिरवणुकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्याच सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pune
mob scuffle to police in ganesh idol immersion at pune

पुण्यात दिवसभर मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. पण या विसर्जन सोहळ्यात काही ठिकाणी अप्रिय घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणुकांना गालबोट लागले आहे. पुण्यातील एका विसर्जन मिरवणुकीत चक्क पोलिसांवरच गुलाल फेकून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्याच सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा – टाकाऊ प्लास्टिकपासून बनवले बाकडे; मुख्यमंत्र्यांनी केलं अनावरण

गुरुजी तालिम मंडळातील कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

पुण्यातील गुरुजी तालिम मंडळाचा मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक वाजत गाजत पुण्याच्या लक्ष्मी रोडवर आली. त्यानंतर तेथील मिरवणूकीत दंग मंडळांच्या काही कार्यकर्त्यांनी प्रमाणाबाहेर गुलाल उधळण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना गुलाल न उधळण्याची विनंती केली. पण पोलिसांचे न ऐकत काही कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवरच गुलाल उधळला. तसेच यावेळी पोलिसांना धक्काबुक्कीसुद्धा करण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.