घरमहाराष्ट्रMPSC च्या परीक्षेत SEBC उमेदवारांना EWS चा पर्याय, पर्याय देण्याची ही आहे...

MPSC च्या परीक्षेत SEBC उमेदवारांना EWS चा पर्याय, पर्याय देण्याची ही आहे डेडलाईन

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) च्या उमेदवारांना खुल्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) असा पर्याय देण्यात आला आहे. उमेदवारांना हा पर्याय देण्यात आल्याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच येत्या १५ जानेवारीपर्यंत एपीएससीच्या ऑनलाईन प्रणालीत उमेदवारांना आपल्या पर्यायात बदल करावा लागणार आहे, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

MPSC exam notification

- Advertisement -

महाराष्ट्रातील SEBC उमेदवारांकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता आणि राज्याच्या नियंत्रणातील लोकसेवांमधील नियुक्त्यांमध्ये तसेच पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आरक्षण अधिनियम २०१८ नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीनुसार राज्यसरकारकडून वेळोवेळी नमूद केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे संबंधित विभागांच्या मागणीनुसार एमपीएससीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या जाहीरातींमध्ये SEBC प्रवर्गासाठी पदे आरक्षित दर्शविण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने SEBC प्रवर्गातील उमेदवारांना सरळसेवा भरतीसाठी EWS आरक्षणाचे लाभ घेता येणार आहेत. त्यानुसार SEBC प्रवर्गातील उमेदवारांकडून अराखीव (खुला) किंवा EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा पर्याय एमपीएससीने दिला आहे.

कोणत्या परीक्षांसाठी मिळणार पर्याय ?

– सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०

- Advertisement -

– राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०

– महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२०

– महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०

 

कधीपर्यंंत मुदत ?

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वरील परीक्षांकरिता अर्जाद्वारे फक्त SEBC प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी २३ डिसेंबर २०२० च्या शासनानुसार विकल्प देणे गरजेचे आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे ५ जानेवारी २०२१ ते १५ जानेवारी २०२१ रात्री २३.५९ वाजेपर्यंत संबंधित परीक्षेकरिता संबंधित परीक्षेसाठी केलेल्या अर्जानुसार SEBC प्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यासाठी खुला अथवा EWS यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे याबाबतचा विलक्प देणे आवश्यक आहे. जे उमेदवार हा पर्याय देणार नाहीत त्यांचा विचार फक्त खुल्या पदावरील निवडीसाठी विचार करण्यात येईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेतल्यास उमेदवार सामाजिक व शैक्षिणकदृष्ट्या मागासप्रवर्गातील आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.

 

आमदार रोहित पवार यांचे उपमुख्यमंत्री अजितदादांना पत्र 

 


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -