घरताज्या घडामोडीधक्कादायक! राज्यात सर्वाधिक बालमृत्यू मुंबईत!

धक्कादायक! राज्यात सर्वाधिक बालमृत्यू मुंबईत!

Subscribe

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक प्रयत्न सुरू असताना देखील राज्यात गेल्यावर्षी तब्बल १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे वैभवसंपन्न मुंबईत बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे एच.एम.आय.एस. च्या अहवालानुसार उजेडात आले आहे. मुंबईत हे प्रमाण गेल्यावर्षी १ हजार ४०२ इतके नोंदवण्यात आल्याची बाब शुक्रवारी विधानसभेत समोर आली आहे. राज्यात नवजात बालकांच्या मृत्यूत वाढ झाल्यासंदर्भात आमदार मंगेश कुडाळकर, आशिष शेलार यांच्यासह एकूण ४६ आमदारांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील माहिती समोर आली आहे. दरम्यान, हे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी विभागातर्फे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात अधोरेखित केले आहे.

राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार एच.एम.आय.एस. च्या अहवालानुसार राज्यात सन २०१८-१९ या काळात २ लाख ११ हजार ७७२ बालकांचे वजन जन्मतःच अडीच किलो पेक्षा कमी असून मुंबई शहर उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची २१ हजार १७९ मुलं जन्मली आहेत. त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ च्या कालावधीत राज्यात १२ हजार १४७ अर्भक मृत्यू, ११ हजार ६६ बालमृत्यू व नवजात मृत्यू झाले आहेत. तसेच १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत १ हजार ७० मातामृत्यू झालेले आहेत.

- Advertisement -

मातामृत्यूची कारणे

• प्रसुती पूर्व उच्च रक्तदाब
• प्रसुती पूर्व आणि पश्चात अति रक्तस्त्राव
• प्रसुती पश्चात किंवा गर्भपात पश्चात जंतूदोष आणि रक्तक्षय

नवजात बालकांच्या मृत्यूची कारणे

• अकाली जन्माला आलेले बाळ
• जन्मतःच कमी वजनाचे बालक
• जंतु संसर्ग
• नुमोनिया
• सेप्सीस
• जन्मतः श्वासावरोध
• आघात
• रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम


हा व्हिडिओ पाहिलात का? – ओबीसी जनगणनेवर अखेर सभापतींनीच दिले आदेश!

एक प्रतिक्रिया

  1. I have been reading about unauthorised footpath encroachment by vendors all over mumbai, thane, and other cities in maharashtra for long time.
    Our government and corporations frequently take action on vendors without result.
    In Kuwait I have witnessed a very effective action.
    They catch and impose fine on customers who buy from such vendors. Magically the problem is solved in short time permanently.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -