एकाच कुटुंबातील चौघांची हत्या 

Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river
Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river

नाशिक : नांदगाव तालुक्यातील वाखरीजवळील जेऊर रस्त्यालगतच्या शेतमळ्यात  राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पती, पत्नी व दोन लहान मुलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. समाधान अण्णा चव्हाण (37), भरताबाई चव्हाण (33), गणेश चव्हाण (6), आरोही चव्हाण (4) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

  चव्हाण कुटूंबिय रात्री घरात झोपले होते. झोपेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. समाधान चव्हाण हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर भरताबाई मोलमजुरी करत होत्या. त्यांची हत्या दरोडेखोरांनी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.