धक्कादायक! दारु ऐवजी सॅनिटायझर पिणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

दारुऐवजी सॅनिटाझर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.

Nagpur
nagpur man gautam goswami dies after drinking sanitizer
दारु ऐवजी सॅनिटायझर पिणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात दारु न मिळाल्याने दारुऐवजी सॅनिटायझरचे सेवन केल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना नागपूरमध्ये घडली आहे. दारुऐवजी सॅनिटाझर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. गौतम गौस्वामी (४५) असे या व्यक्तीचे नाव असून गौस्वामी हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांना दारुचे व्यसन होते. मात्र, त्यांना दारु न मिळाल्याने त्यांनी सॅनिटायझरचे सेवन केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गंगाबाई घाट परिसरात गौतम गौस्वामी राहत होते. त्यांना दारुचे व्यसन होते. मात्र, सध्या दुकान बंद असल्याने त्यांनी सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – लग्नसोहळा ठरला जीवघेणा! नवऱ्या मुलाचा मृत्यू, ९५ वऱ्हाडी पॉझिटिव्ह!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here