घरमहाराष्ट्रनाशिक१०८ रुग्णवाहिकेने घेतला अचानक पेट

१०८ रुग्णवाहिकेने घेतला अचानक पेट

Subscribe

मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावकडून नाशिकच्या दिशेने रुग्णाला घेऊन जात असलेल्या १०८ रुग्णवाहिकेने चांदवड तालुक्यातील राहुड शिवारात अचानक पेट घेतला. बुधवारी, २० मार्चला रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने प्राणहानी टळली.

- Advertisement -

नामपूर रुग्णालयाची रुग्णवाहिकेने राहुड शिवारातून जात असताना अचानक पेट घेतला. यावेळी झालेला स्फोट इतका भयानक होता की त्याचा हादरा आजूबाजूच्या परिसरात जाणवला. यावेळी चांदवड व उमराणे येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तत्काळ पोहोचून मदतकार्य सुरू केले. रुग्णासह डॉक्टरांना अन्य रुग्णवाहिकेतून नाशिकच्या दिशेने पाठविण्यात आले. चांदवड येथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ. सतीश गांगुर्डे व डॉ. भालचंद्र पवार, सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. तसेच, सोमा कंपनीच्या अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान, रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीचे कारण आणि स्फोट नेमका कशाचा झाला, याचा तपास सुरू आहे. महामार्गावरील या घटनेमुळे वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -