घरमहाराष्ट्रनाशिकविधवा महिलेकडे मागितली १ कोटींची खंडणी

विधवा महिलेकडे मागितली १ कोटींची खंडणी

Subscribe

कॅनडा कॉर्नर परिसरात राहणार्‍या एका विधवा महिलेकडून बळजबरीने खंडणी वसुली करण्यासाठी तिच्या संपत्तीचे बनावट कागदपत्रे तिघांनी बनवून पीडितेला भीती दाखवत धक्काबुक्की, विनयभंग केल्याची घटना घडली.

कॅनडा कॉर्नर परिसरात राहणार्‍या एका विधवा महिलेकडून बळजबरीने खंडणी वसुली करण्यासाठी तिच्या संपत्तीचे बनावट कागदपत्रे तिघांनी बनवून पीडितेला भीती दाखवत धक्काबुक्की, विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तीघांवर खंडणी वसुलीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

जयेश कृष्णकांत पारखे, आशा जयेश पारखे (दोघेही रा. नयनतारा हाईट्स, मायको सर्कल, नाशिक), सुरेश वैश्य (रा. ७०३, सावरकरनगर, गंगापूररोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले. जयेश पारखे, आशा पारखे या दाम्पत्यासह सुरेश वैश्य यांनी संगनमत करून खंडणी वसुलीसाठी महिलेवर दबाव वाढविला. पतीला मृत्यूपूर्वी एक कोटी रुपये दिल्याचे पीडितेला तिघांनी सांगितले. त्या बदल्यात कॅनडा कॉर्नर येथील सदनिका व जळगाव येथील शेती या जागेचे बनावट नोटरी कागदपत्रे दाखवली. तिघांनी पीडितेच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जानेवारी २०१८ पासून मंगळवार (ता. ९) पर्यंत तिघांनी पीडितेचा पाठलाग करत दबाव टाकला. पारखे दाम्पत्याने कॅनडा कॉर्नर येथे पीडित महिलेचे वाहन अडविले. दोघांनी मिळून पीडितेला धक्काबुक्की करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत शिवीगाळ केली. एक कोटी रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही पारखे दाम्पत्याने दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून तिघा संशयितांविरुद्ध खंडणी वसुली, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक योगीता नारखेडे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -