घरमहाराष्ट्रनाशिकअहमदाबाद तिकिट दरांवरून विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा

अहमदाबाद तिकिट दरांवरून विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा

Subscribe

अलायन्स एअर पाठोपाठ बुधवारी १३ फेब्रुवारीपासून ट्रू जेटनेही नाशिकहून अहमदाबाद विमानसेवेचा प्रारंभ केला. या सेवेमुळे अहमदाबादसाठी दोन कंपन्यांचे पर्याय नाशिककरांना उपलब्ध झाले आहेत. आता अलायन्स एअर आणि ट्रू जेट या दोन्ही कंपन्यांमध्ये तिकिट दरावरूनही स्पर्धा होणार आहे.

अलायन्स एअर पाठोपाठ बुधवारी १३ फेब्रुवारीपासून ट्रू जेटनेही नाशिकहून अहमदाबाद विमानसेवेचा प्रारंभ केला. या सेवेमुळे अहमदाबादसाठी दोन कंपन्यांचे पर्याय नाशिककरांना उपलब्ध झाले आहेत. आता अलायन्स एअर आणि ट्रू जेट या दोन्ही कंपन्यांमध्ये तिकिट दरावरूनही स्पर्धा होणार आहे. ट्रू जेटने उडाण योजनेत नाशिक अहमदाबादसाठी १८०० रुपये, तर अलायन्स एअरने २,९०० रूपये तिकिट दर निश्चित केले आहेत.

ओझर विमानतळावर बुधवारी १३ फेब्रुवारीस खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते केक कापून ट्रू जेटच्या नाशिक अहमदाबाद सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी एचएएलचे सीईओ शेषागिरी राव, ट्रू जेटचे अधिकारी नैनिश जोशी, सुधीर राघवण, निमाचे मनिष रावल आदी उपस्थित होते. कंपनीच्या सेवेला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी नाशिकहून ५३ प्रवाशांनी नाशिकहून अहमदाबादला उड्डाण केले. अहमदाबादहून ४३ प्रवासी नाशिक ओझर विमानतळावर उतरले. नाशिकहून हवाई सेवेचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे. अलायन्स एअरने १ फेब्रुवारीपासून नाशिक अहमदाबाद सेवा सुरू केली. सेवा सुरू झाल्यापासून नाशिक अहमदाबाद सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रू जेटतर्फे बुधवार ते शनिवार या आठवडयातील चार दिवस सेवा दिली जाणार आहे. अलायन्स एअरकडून अहमदाबादसाठी रविवार वगळून सहाही दिवस सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अहमदाबाद सेवेसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत.

- Advertisement -

पुढील चार दिवस बुकिंग फुल्ल

ट्रू जेटच्या आजच्या पहिल्याच सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला पुढील तीन दिवसांचे तिकिटही जवळपास बुक झाल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. ७० आसन क्षमतेच्या या विमानात ३५ सीटस या उडाण योजनेंतर्गत राखीव असतील. गुरूवार ते शनिवारसाठी दररोज सुमारे ६० प्रवाशांनी बुकिंग केले आहे. या सेवेमुळे नाशिकहून अहमदाबादला कामानिमित्त जाणार्‍या उद्योजकांना एका दिवसात कामकाज आटोपून नाशिकला परतणे शक्य होणार आहे.

अशी असेल सेवा

अहमदाबाद येथून दुपारी २.५० ला विमान उड्डाण करेल. हे विमान ४.०५ ला नाशिकला ओझर येथे उतरेल. परतीच्या प्रवासात ओझर येथून ४.३५ ला उड्डाण करणार असून, अहमदाबादला ते सायंकाळी ६ ला पोहोचेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -