घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस उपअधीक्षकांना शिवीगाळ; ९ जणांना अटक

पोलीस उपअधीक्षकांना शिवीगाळ; ९ जणांना अटक

Subscribe

अहमदनगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना शिवीगाळ करून त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचार्‍यास धक्काबुकी केल्याप्रकरणी फरार ९ आरोपींना आज अटक करण्यात आली

अहमदनगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना शिवीगाळ करून त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचार्‍यास धक्काबुकी केल्याप्रकरणी फरार ९ आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

सचिन थोरात, किरण नेटके, अक्षर सावळे, प्रकाश कनोजिया, शाहरुख पठाण, ऑगस्टीन जी, आकाश बिडकर, बॉबी साळवे, अर्शद (पूर्ण नाव नाही) या ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दीपक पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे आरटीपीसी गणेश चव्हाण यांची फसवणूक, अरेरावी शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ११ आरोपी होते. गुन्हा घडला त्याच रात्री मुख्य दोन आरोपींना पकडण्यात आले होते. घटनेपासून इतर ९ आरोपी फरार झाले होते. पोलीस शोध घेत असताना फरार आरोपी सापडले. त्यांना पकडून सकाळी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

- Advertisement -

उपअधीक्षक मिटके हे १ मे रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या मोपेडवर (एम एच २३ बीएफ १५९०) आरटीपीसोबत पेट्रोल भरण्यासाठी झोपडी कॅन्टिनजवळील जोशी पेट्रोल पंपावर गेले असता पेट्रोल टाकणार्‍या कर्मचार्‍याने २०० रुपये घेऊन हातचलाखीने १०० रुपयाचे पेट्रोल टाकले. हा प्रकार उपअधीक्षक मिटके यांच्या लक्षात आला. त्यांनी गाडीत कमी पेट्रोल का टाकले, याची विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाला होता. पंपावरील कर्मचार्‍यांनी समाधानकारक उत्तर न देता मिटके व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ, दमदाटी करून उद्धट वर्तन केले. तसेच, पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांना धक्काबुक्की केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -