कचराकुंडीत आढळले मृत अर्भक

navi mumbai bar dancer thief caught while stealing child

महिला सार्वजनिक शौचालयाजवळील कचराकुंडीत सहा महिन्याचे मृत अवस्थेत असलेले अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रमाबाई आंबेडकरनगर, मालधक्का रोड, नाशिकरोड येथे घटना उघडकीस आली. अनैतिक संबंधातून अर्भक जन्माला आले असावे, असा संशय पोलिसांना असून नाशिकरोड पोलीस निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरात शनिवारी (दि.५) शिक्षक दिन साधेपणाने साजरा केला असताना दुसरीकडे निर्दयी मातेने मृत अर्भक कचराकुंडीत टाकून खळबळ उडवून दिली आहे. या परिसरातील प्रशांत रोकडे यांना कचराकुंडीत अर्भक मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. या घटनेची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत अर्भकाच्या आईचा शोध करु केला आहे. अनैतिक संबंधातून अर्भक जन्माला आले असावे. समाजात बदनामी होईल, या भितीपोटी तिने मृत अवस्थेत अर्भक टाकून दिले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.