Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र धनंजय मुंडे प्रकरण; सत्य पोलिसांनी समोर आणावे

धनंजय मुंडे प्रकरण; सत्य पोलिसांनी समोर आणावे

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची मागणी

Related Story

- Advertisement -

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मध्यप्रदेशातील एका महिलेने मुंबई पोलिसांत बलात्काराची तक्रारकेली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टवर त्याबाबत कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून तातडीने सत्य समोर आणावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नैतिकतेच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत विचार करण्याची गरज आहे. संबंधित महिला आणि मुंडे या दोघांच्याही बाजू सध्या न्यायालयात आहेत. मात्र, असे संशयाचे वातावरण योग्य नाही. पोलिसांनी तत्काळ सत्य जनतेसमोर आणावे, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -