CORONA: देवळा तालुक्यात पुन्हा आठ बाधित

जनतेने घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन

corona
Corona: देवळा तालुक्यात पुन्हा आठ कोरोना बाधित

जगदीश निकम : देवळा

तालुका प्रशासनाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालांत देवळा तालुक्यात आणखी ८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज प्राप्‍त ५४ अहवालांपैकी ४६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. देवळा तालुक्यातील जनतेने घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांनी केले आहे.

गावनिहाय बाधित असे…

देवळा -२ (१ पुरुष, १ महिला) गुंजाळनगर -१ (१ पुरुष ), उमराणे-३ (३ पुरुष), दहिवड – २ (२ पुरुष)