घरमहाराष्ट्रनाशिकमहिला कर्मचाऱ्यास धमकी; अनिल बूब यांच्याविरुद्ध गुन्हा

महिला कर्मचाऱ्यास धमकी; अनिल बूब यांच्याविरुद्ध गुन्हा

Subscribe

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला कर्मचाऱ्याला अरेरावी करत धमकी देण्यापर्यंत मजल

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सेविकापदावर कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्‍यास माजी व्यापारी प्रतिनिधी व त्यांच्या पुत्राने अरेरावी करत धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवाशुल्क आकारण्याची जबाबदारी सेविका रोहिणी थोरात यांच्यावर आहे. त्या गुरुवारी (ता.१६) दुपारी दीडच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना एक गाडी धान्य घेऊन वाहन प्रवेशव्दारावर आली. त्यावेळी त्यांनी वाहनचालकाकडे बिलाची मागणी केली असता चालकाने थोरातांना उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावेळी माजी व्यापारी प्रतिनिधी अनिल बूब यांच्या पुत्राने घटनास्थळी येत थोरातांना अरेरावी करत तुम्हाला बिले दाखवितो, असे सांगितले. अनिल बूब यांना फोन करून थोरातांना धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अनिल बूब व पुत्राविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -