घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : सुधीर मुनगंटीवार

नाशिकच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : सुधीर मुनगंटीवार

Subscribe

नाशिक शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या अर्थसंकल्पात शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नाशिक शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या अर्थसंकल्पात शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अनंत कान्हेरे मैदान येथे आयोजित नाशिक शहरातील विविध विकासकामांच्या भुमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

श्री.मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रयतेचे राज्य आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दारिद्र्य रेषेवरील गरजूंना रास्त किंमतीत धान्य उपलबध करुन देण्यात येत आहे. बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन गरीबांच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील १० कोटी नागरिकांना ५ लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

आमदार यांनी प्रास्ताविकात विकासकामांची माहिती दिली. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री महोदयांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे नाशिकच्या विकासाला संधी मिळाली आहे असे त्यांनी सांगितले. एकूण ४५ कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपुजन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यात इंदिरानगर येथील जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅक, भाभानगर येथील १०० खाटांचे सावित्रीबाई फुले महिला शासकीय रुग्णालय, आकाशवाणी जॉगिंग ट्रॅकजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव व अनंत कान्हेरे मैदान येथे जागतिक दर्जाचे क्रिडांगण विकसित करण्याच्या कामांचा समावेश आहे.

Mungantiwar1
विविध विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्ति आयोजित कार्यक्रमाला नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -