घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये पुन्हा धान्य घोटाळा

नाशिकमध्ये पुन्हा धान्य घोटाळा

Subscribe

रेशन दुकानदारांना शासनाने पुरेसा धान्य पुरवठा करुनही प्रत्यक्षात जिल्ह्यातील ६४ दुकानदारांनी लाभार्थ्यांपर्यंत हे धान्यच पोहचवले नसल्याची धक्कादायक बाब ‘आपलं महानगर’च्या पाहणीत उघडकीस आली आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यामुळे तब्बल १९ हजार शिधापत्रिकाधारक हक्काच्या धान्यापासून वंचित आहेत.

मनीष कटारिया

रेशन दुकानदारांना शासनाने पुरेसा धान्य पुरवठा करुनही प्रत्यक्षात जिल्ह्यातील ६४ दुकानदारांनी लाभार्थ्यांपर्यंत हे धान्यच पोहचवले नसल्याची धक्कादायक बाब ‘आपलं महानगर’च्या पाहणीत उघडकीस आली आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यामुळे तब्बल १९ हजार शिधापत्रिकाधारक हक्काच्या धान्यापासून वंचित आहेत. घोटाळा नक्की किती कोटींचा आहे, याची आकडेमोड जिल्हा पुरवठा विभाग करीत असला तरीही दोषींवर वेळीच कारवाई न झाल्याने पुरवठा विभागाचे दुकानदारांना अभय होते का असा सवाल केला जात आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हा पुरवठा विभाग आणि धान्य घोटाळा हे जणू समीकरणच बनलंय. अद्याप सुरगाणा, वाडीवर्‍हे धान्य घोटाळ्याचा तपास पूर्ण झालेला नसताना दर महिन्याला नवनवे घोटाळे समोर येत आहेत. रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉईंट ऑफ सेल (पॉस) मशिनचा वापर सुरू करण्यात आला. मात्र वारंवार सांगूनही रेशन दुकानदारांकडून निरनिराळ्या सबबी देत रेशन धान्य ऑनलाईन पद्धतीने वितरणाकडे पाठ फिरविली जाते. अनेक ठिकाणी नेटवर्क नसणे, लाभार्थ्यांच्या अंगठयाचे ठसे न जुळणे आदी कारणे देऊन पळवाटा शोधल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा ऑनलाईन धान्य वितरणाच्या आढाव्यात बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, पेठ तालुक्यांमध्ये धान्य वितरणात तफावत आढळली. या घोटाळयाचा तपास गुलदस्त्यात असतानाच आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ६४ रेशन दुकानांत जानेवारी महिन्यातील धान्य वाटपात तफावत आढळून आली आहे. यात प्रामुख्याने ५० टक्के उलाढाल कमी झाली आहे. रेशन दूकानदार कार्डधारकांप्रमाणे नियतन उचलतात, वितरण कमी झाले तर अतिरिक्त धान्य गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा घोटाळा मंत्रालय स्तरावरून निदर्शनास आणून देण्यात आला. यावरूनच जिल्हा पुरवठा विभाग किती सजग आहे हे दिसून येते. पुरवठा मंत्रालयाकडून याबाबत सजग केल्यानंतर जिल्हा पुरवठा विभाग खडबडून जागा झाला आहे. तहसीलदारांना तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्रालयस्तरावरून लक्ष

- Advertisement -

पुरवठा मंत्रालयाकडून जिल्हा पुरवठा विभागाला पाठवण्यात आलेल्या यादीत जिल्ह्यातील ६४ रेशन दुकानदारांची तालुकानिहाय यादी देण्यात आली आहे. यात संबधित रेशन दुकानदाराचे नाव, त्याच्याकडील रेशनकार्डची संख्या आणि त्याने वाटप केलेले धान्य याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. तर काही रेशन दूकानांतून जानेवारी महीन्यात धान्य वाटपच झाले नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.याचाच अर्थ शासन स्तरावरून धान्य वितरण व्यवस्थेवर बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे दिसून येते.

दुकानांच्या तपासणीचे आदेश

शासनाकडूनच आम्हाला रेशन दूकानांची यादी प्राप्त झाली आहे. यावरून ६४ रेशन दुकानांत पन्नास टक्कयांहून कमी उलाढाल झाल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही तातडीने तहसीलदारांना नोटीसा बजावून संबधित रेशन दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. – श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी

तालुकानिहाय तफावत आढळलेली दुकाने

  • पेठ – ९
  • बागलाण – १
  • नाशिक – ३५
  • सुरगाणा – ४
  • नांदगाव – ३
  • सिन्नर – ५
  • मालेगाव – २
  • निफाड – २
  • चांदवड – १
  • दिंडोरी – २
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -