घरमहाराष्ट्रनाशिकभारत-मलेशिया यांच्यात व्यापार-उद्योग वाढीसाठी सामंजस्य करार

भारत-मलेशिया यांच्यात व्यापार-उद्योग वाढीसाठी सामंजस्य करार

Subscribe

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अॅग्रिकल्चर आणि मलेशिया इंडिया बिझनेस कौन्सिल यांचा पुढाकार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अॅग्रिकल्चर आणि मलेशिया इंडिया बिझनेस कौन्सिल यांच्यात भारत-मलेशिया या देशांतील व्यापार-उद्योग वाढीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व कौन्सिलचे अध्यक्ष तान इर. कुना सित्तमपलाम यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

महाराष्ट्र चेंबरतर्फे व्यापार उद्योग, शेती व शेतीशी निगडित व्यवसायासोबतच देश व परदेशात आयात निर्यात वाढावी, शेतीमालाला चांगली बाजारपेठ व योग्य भाव मिळावा यासाठी विविध देशांचे दौरे करून माहितीची देवाण-घेवाण व सामंजस्य करार केले जात असल्याचे या वेळी मंडलेचा यांनी सांगितले. या सामंजस्य करारामुळे भारत आणि मलेशिया या दोन्ही देशांदरम्यान व्यापार-उद्योग वाढेल. माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण होऊन त्याचा लाभ व्यापारी-उद्योजक, शेतकऱ्यांना होऊन गुंतवणूक व व्यापारही वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारताचे उच्चायोग वाणिज्य व माहितीचे प्रमुख वरुण जेफ, कौन्सिलचे उपाध्यक्ष तान श्री दातो पुवन, मानद सचिव कॅप्टन सुरेंद्रन मेनन, सदस्य दिवेश शेठ, डॉ. मोहम्मद अली सलीम. एन. मुहम्मद रिझुआन, अलमग, चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, चेंबरच्या कृषी प्रक्रिया समितीच्या अध्यक्षा सुनीता फाल्गुने, विश्वस्त विलास शिरोरे, चेंबरच्या एम.एस.एम.ई. कमिटीचे चेअरमन आशिष नहार व कार्यकारिणी सदस्य कल्पेश लोया, चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे, उपसचिव वनिता घुगे उपस्थित होते.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय फळे, खाद्य पदार्थांचे प्रदर्शन

मलेशियात क्वालालंपूर येथे आंतरराष्ट्रीय फळे आणि खाद्य पदार्थांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २८ जूनपर्यंत सुरू राहील. या प्रदर्शनात संतोष मंडलेचा व सुनीता फाल्गुने यांच्या पुढाकाराने हे शिष्टमंडळ मलेशिया दौऱ्यावर गेलेले आहे. ११६ प्रतिनिधींच्या या शिष्टमंडळात प्रतिष्ठित उद्योग कंपन्यांचे संचालक, प्रतिनिधी आहेत. तसेच, महाराष्ट्रातील बागाईतदार, शेतकरी व खाद्य पदार्थ उत्पादक-व्यावसायिकांचादेखील सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -