घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचे सुपूत्र सहायक कमांडंट नितीन भालेराव शहीद

नाशिकचे सुपूत्र सहायक कमांडंट नितीन भालेराव शहीद

Subscribe

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे घडवलेल्या विस्फोटात झाले शहीद

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे (इम्प्रुव्हाईज्ड एक्सफ्लोजिव्ह डिव्हाइस) घडवलेल्या विस्फोटात सीआरपीएफच्या जंगल वॉरफेअर (कोब्रा) युनिटचे सहायक कमांडंट व नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव हे शहीद झाले. शनिवारी (दि.28) रात्री साडेआठ वाजता हा स्फोट घडवून आणण्यात आला. पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान नितीन भालेराव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रविवारी (दि.29) सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुकमा येथील ताडमेटला भागात स्फोटात बटालियन फॉर रिझोल्यूशन अ‍ॅक्शन (कोब्रा) 206 बटालियन गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी डाव साधला. भीषण स्फोटात सेकंड-इन-कमांड रँकच्या अधिकार्‍यांसह इतर दहा कमांडो गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मध्यरात्री हेलिकॉप्टरने रायपूर येथे हलवण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना पहाटे 3.30 वाजता नितीन भालेराव यांचे निधन झाले. दरम्यान, नाशिकचे सुपुत्र सहायक कमांडर नितीन भालेराव हे शहीद झाले आहेत. या घटनेचे वृत्त समजताच भालेराव परिवारावर तसेच आप्त स्वकियांमध्ये शोक पसरला आहे. भालेराव कुटुंब हे इंदिरानगर परिसरात वास्तव्यास आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -