Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक लढाऊ विमानांचे उत्पादन ठप्प

लढाऊ विमानांचे उत्पादन ठप्प

एचएएल व्यवस्थापनाकडून कामगारांच्या संपाकडे कानाडोळा

Related Story

- Advertisement -

नाशिक8सुखोई या लढाऊ विमानाचे उत्पादन करणार्‍या ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीच्या साडेतीन हजार कामगारांनी सोमवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. आज संपाचा तिसरा दिवस होता. त्यामुळे लढाऊ विमानांचे उत्पादन ठप्प झाले आहे.एचएएल व्यवस्थापनाने हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्याकडे दूर्लक्ष केले आहे.

एचएएलमध्ये २०१७ पासून वेतन करार रखडल्याने हा संप करण्यात येत असल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे. एचएएलचे ओझरसह देशात नऊ कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये १९ हजारांहून अधिक कामगार आहेत. या कामगारांचा वेतन करार १ जानेवारी २०१७ रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर हा करार झालेला नाही. गेल्या ३४ महिन्यांत कामगार संघटना आणि एचएएल व्यवस्थापन यांच्यात चर्चेच्या तब्बल ११ बैठका झाल्या. मात्र यावर तोडगा न निघाल्याने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आज तिसर्‍या दिवशीही कामगारांनी हा संप सुरूच ठेवत प्रवेशव्दारावर धरणे आंदोलन केले. व्यवस्थापनाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. या  आरोपानंतर कामगार संघटनेनेही याबाबत खुलासा केला आहे.एचएएल हा भारत सरकारचा संरक्षण क्षेत्रातील विमान निर्मिती करणारा एकमेव सार्वजनिक उद्योग आहे. संपूर्ण भारतभरात वेगवेगळ्या राज्यात एचएएलच्या जवळपास नऊ विभाग आहेत. याठिकाणी देशी-विदेशी बनावटीची विविध विमाने बनविली जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने मीग 21, मीग 27, 29, मिराज , सुखोई 30, एएलएच , एलसीएच, एलसीए आदि लढाऊ विमाने बनविली जातात. एचएएलने आजतागायत मिग सिरीजची जवळपास एक हजार आणि सुखोई 30 ची 200 लढाऊ विमाने उत्पादित केली आहेत. तसेच, सुखोई 30 चे ओव्हरहॉल आणि तेजसच्या विमान निर्मितीचे काम सुद्धा सुरु आहे.भारतीय हवाई दलाकडून एचएएलचे २० हजार कोटी घेणे बाकी आहे. दुसर्‍या बाजुला सरकारने एचएएलचा रिजर्व्ह फ़ंड जवळपास बारा हजार कोटी लाटला आहे. परिणामी एचएएलची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे बोलले जात आहे,असे असताना वेतनकरार होण्याची तारीख १ जानेवारी २०१७ उलटुन 3 वर्ष झाली आहेत.

- Advertisement -

अधिकार्‍यांचा वेतनकरार हा तीन वर्षांपूर्वीच झाला असुन त्यांना जवळपास 37 टक्के पगारवाढ दिली आहे. त्या तुलनेत कामगारांचा 8 टक्के पगार वाढला आहे. सखोई 30 विमानाचे ओव्हरहॉल तसेच तेजस विमानांची निर्मिती सुरू आहे. असे असताना एचएएलची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचा व्यवस्थापनाकडून कांगावा केला जात असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे. 

आजपर्यंतच्या अनेक बैठकांमधून व्यवस्थापनाने सन्मानजनक अशी कुठलीही ऑफर दिलेली नाही. याउलट वेल्फेअर संबंधीत अनेक सवलती सतत कमी करण्याचा सपाटाच लावला आहे. सतत दुजाभावाचे आणि वेळकाढुपणाचे धोरण व्यवस्थापनाकडुन घेतले जात आहे. कामगार संघटनांनी वेळोवेळी, संयमाने, सनदशीर लोकशाही मार्गाने लढा देवूनही  व्यवस्थापनाकडून कुठलीही दाद मिळत नाही, असा आरोपही संघटनांनी केला असून याबाबत सनदशीर मार्गाने लढा सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

तोडगा निघालेला नाही

- Advertisement -

गेल्या ३४ महिन्यांपासून वेतन करार करण्यात आलेला नाही. व्यवस्थापनाकडून सन्मानजनक प्रस्ताव दिला जात नाही. संपावर जाण्यापूर्वी मागण्यांचे पत्र व्यवस्थापनाला दिले होते. त्यात तोडगा निघाला नाही. – बी. व्ही. शेळके, अध्यक्ष,  एचएएल कामगार संघटना, नाशिक

- Advertisement -