घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेतील गटनेता निवड लांबणीवर

जिल्हा परिषदेतील गटनेता निवड लांबणीवर

Subscribe

जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड लांबणीवर, पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका

जिल्हा परिषदेचे गटनेते धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे रिक्त पदावर निवडीसाठी बोलावलेली शिवसनेनेची बैठक लांबणीवर पडली आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य करण्याचे आदेश दिल्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

येत्या आठ महिन्यांत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षासह विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षाच्या सदस्यांना महत्व प्राप्त झाले असून, सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याच्यादृष्टीने आतापासून रणनिती आखली जात आहे. शिवसेनेचे गटनेते धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे काही सदस्य राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळे पक्षाची गळती थांबवण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात पक्षाचे कार्यकर्ते गुंतल्याने गटनेत्यांची निवड रखडली आहे. जलव्यवस्थापन समितीची बैठक होणार असल्याचे सांगत शिवसेनेने गटनेते पदासाठी चाचपणी केली. मात्र, पक्षादेश नसल्यामुळे त्यांची निवड रखडल्याचे समजते.

- Advertisement -

बाळासाहेब क्षीरसागर गटनेते?

निफाड तालुक्यातील उगाव गटाचे सदस्य बाळासाहेब क्षिरसागर हे गटनेते होण्याची शक्यता आहे. निफाड तालुक्यात शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या गोटातील क्षिरसागर यांची निवड होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -