घरमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी जाणाऱ्या महामार्गाला मुहूर्त मिळेना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी जाणाऱ्या महामार्गाला मुहूर्त मिळेना

Subscribe

पुणे जिल्ह्यातून निघणारा आणि बाणकोटपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा खरा तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी म्हणजे आंबडवे या गावी जाणारा आहे. या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळून एक वर्ष झाले तरी या मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या मार्गाचे भूमिपूजन नवीन सावित्री पूल उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव. या मार्गाचे नामकरण बाणकोट-रायगड ते पुणे हद्द असे करण्यात आले असून, याचे नूतनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला आहे. यामुळे आता याची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एस १५ अशी नोंद करण्यात आली आहे. भूमिपूजनाला आता एक वर्ष उलटून गेले, तर सदर कामाचा कार्यारंभ आदेश ६ डिसेंबर २०१८ रोजी देण्यात आला आहे. मात्र अद्याप या मार्गाच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. हा मार्ग महाड जवळून जात असल्याने या मार्गावरील १२.७५ हेक्टर जागा संपादन करावयाची आहे. याकरिता शेतकर्‍यांना नुकत्याच नोटिसा देण्यात आल्या आहेत. भूसंपादन प्रक्रिया देखील संथ गतीने सुरू आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील पाच्रळ ते आंबडवे असा हा मार्ग असून, त्याची हद्द बाणकोट ते पुणे अशी आहे. हा मार्ग यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र तो आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला आहे. ५९.७२५ किलोमीटर मार्गाला मंजुरी प्राप्त झाली आहे. या महामार्गाला भूसंपादनासह ३८१.०८ मंजूर झाले आहेत. याकरिता दीड वर्षाची मुदत देण्यात आली आहे. एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनीने हे काम घेतले असून, सदर कंपनीने रस्त्यालगत असलेल्या सरंक्षण कठड्यांचे काम सुरू केले आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्याप सुरू केलेले नाही.

प्रतिवर्षी महाडमधील चवदारतळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण राज्यातून लाखो भीमसैनिक येत असतात. यातील अनेकजण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव आंबडवे येथे भेट देण्यास जातात. महाडमधूनच रेवतळे मार्गे मंडणगड मार्गे या गावात जाण्याकरिता मार्ग आहे. गेले अनेक वर्षे या मार्गाची दुरुस्ती झाली नव्हती. यामुळे भिमसैनिकांचे हाल होत असतात.

- Advertisement -

या कामासाठी ६ डिसेंबर २०१८ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. दोन मागिर्र्केचा हा रस्ता असून, याचे भूसंपादन देखील सुरू करण्यात आले आहे. काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप काम सुरू न केल्याने संबंधित ठेकेदाराला कळविण्यात आले आहे.
-प्रकाश गायकवाड, उप अभियंता, महामार्ग बांधकाम विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -