घरमहाराष्ट्रमोदींचा डबल बार; पवारांचे कट्टर समर्थक भाजपच्या व्यासपीठावर

मोदींचा डबल बार; पवारांचे कट्टर समर्थक भाजपच्या व्यासपीठावर

Subscribe

अकलूज येथील सभेत एकेकाळी शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानणाऱ्या अनेक नेत्यांना एकत्र व्यासपीठावर भाजपाने आणले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी देखील मोदींच्या प्रचार सभेत हजेरी लावली

शरद पवार यांचा बालेकिल्ले म्हणून ओळख असलेल्या माढा आणि बारामतीला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने खेळी आखायला सुरुवात केली आहे. बुधवारी अकलूज येथील सभेत एकेकाळी शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानणाऱ्या अनेक नेत्यांना एकत्र व्यासपीठावर भाजपाने आणले आहे. त्यामध्ये एकेकाळी राष्ट्रवादी असलेले आणि आता आमदार असलेले प्रशांत परिचारक, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाला पाठिंबा दिलेले शेखर गोरे, काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले कल्याण काळे, विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार जयंतराव जगताप मोदींच्या सभेला एकत्र आले. त्यामुळे आघाडीला आणि खासकरून पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडायला भाजपाने सुरुवात केली आहे.

पवारांचे साथीदार माढ्याला लावणार सुरुंग ?

- Advertisement -

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी देखील मोदींच्या प्रचार सभेत हजेरी लावली. त्यामुळे पवारांचे हे एकेकाळचे साथीदारच आता पवारांचा बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघात सुरुंग लावतात की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान माढा मतदारसंघातून शरद पवार उभे राहिले असते तर यावेळी शरद पवार यांना पडण्याची भीती होती. त्यामुळे शरद पवार यांनी मतदार संघाचा अंदाज घेत माघार घेतल्याचे काही स्थानिक नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -