घरमहाराष्ट्रपुण्यात कोट्यवधी रुपये किंमतीच्या जुन्या नोटा जप्त; तिघांना अटक

पुण्यात कोट्यवधी रुपये किंमतीच्या जुन्या नोटा जप्त; तिघांना अटक

Subscribe

रात्रीच्या गस्तीवर असताना शिरुर पोलिसांनी एका संशयास्पद कारवर कारवाई केली. यावेळी पोलिसांना कारमध्ये कोट्यवधी किंमतीच्या जुन्या नोटा सापडल्या.

पुण्यातील कवठे येमाई येथील एका संशयास्पद कारवर पोलिसांनी कारवाई करून एक कोटी २६ हजार किंमतीच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. शिरुर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तिघांना अटक केली आहे.

५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा जप्त

कवठे येमाई या ठिकाणी शिरुर पोलीस रात्रीची गस्त घालत होते. यावेळी एका कार चालकाच्या संशयास्पद हालचालीमुळे शिरुर पोलिसांनी त्याची चौकशी केली. यावेळी कारच्या आसनाखाली जुन्या नोटा लपविण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी १ कोटी २६ हजार किंमतीच्या ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा आढळल्या. याबाबत विचारले असता कार चालक आणि त्याच्या साथीदारांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

नोटा पुण्यातील बड्या बिल्डरच्या

गणेश कोळेकर, अमोल दसगुडे आणि समाधान नरे या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून या तिघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटा या पुण्यातील एका बड्या बिल्डरच्या असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -