घरमहाराष्ट्रएकतर्फी प्रेमातून तरुणाची ब्लेडने नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून तरुणाची ब्लेडने नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

यवतमाळला शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या रोहितचे तेव्हा पासून त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते

एकतर्फी प्रेमातून तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. रोहित अमित पटोवाल वय-२८ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेची माहिती जखमी रोहितच्या वडिलांना पोलिसांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

अशा घडली घटना

रोहितचे महाविद्यालयात असताना एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. ती मुलगी सध्या हिंजवडी येथे वास्तव्यास असते. सकाळी रोहित त्या मुलीच्या थेट ऑफिसमध्य़े गेला. त्यानंतर त्यानं तुझ्याशी बोलायचे, असे त्यांने तिला सांगितले. परंतु, तिने बोलण्यास नकार दिला. यामुळे नैराश्यात असलेल्या रोहितने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या समोरच ब्लेडच्या सहाय्याने नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

- Advertisement -

पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न करावा, असा रोहितचा मुळीच हेतू नव्हता. तो केवळ योगायोग झाला असल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले आहे. रोहित हा मूळ अमरावतीचा असून प्रेयसी ही यवतमाळची असल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित पुण्यातील कात्रज येथे राहत असून आज सकाळी तो हिंजवडी भागात प्रेयसी काम करत असलेल्या ठिकाणी गेला होता. रोहित यवतमाळला शिक्षण घेण्यासाठी होता. तेव्हा, पासून त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम रोहित करत होता, अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती जखमी रोहितच्या वडिलांना पोलिसांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.


कळवण तालुक्यात बोअरमध्ये पडलेल्या ६ वर्षाच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -