घरमहाराष्ट्रकोरोनाला रोखण्यासाठी अटीतटीची शर्थ

कोरोनाला रोखण्यासाठी अटीतटीची शर्थ

Subscribe

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हादरले आहे. आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. पनवेल मनपा क्षेत्रात बाधितांचा आकडा काही दिवसात वाढलेला जरी दिसत असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जास्तीत-जास्त आरोग्य सुविधा कशी उपलब्ध करता येईल, याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत आहे. कोरोनाला रोखण्याच्या अटीतटीच्या लढाईत नागरिकांनी शासनाने, प्रशासनाच्या नियमांचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ‘दै.आपलं महानगर’शी बोलताना केले.

पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख पुढे म्हणाले की, पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका आहे. जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबाग येथे आहे. जिल्ह्यतील नागरिक वैद्यकीय सुविधांसाठी पनवेल किंव्हा मुंबईमध्ये असलेल्या आरोग्याच्या सुविधांवर अवलंबून आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पनवेल महापालिकेने कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध केली असल्याचे आयुक्त देशमुख यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

पनवेल शहरा राहणारी लोकं ही मुंबईत कामधंद्यासाठी जातात. मंत्रालयापासून ते लहान-मोठ्या कंपनीत काम करणार्‍या नोकरवर्गाची संख्या जास्त आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात वाढलेला ९० ते ९५ टक्के कोरोनाचा प्रादुर्भाव हा मुंबईतून दररोज ये-जा करणार्‍यांमुळे आहे, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नमूद केले. बाहेरून येणार्‍यांमुळे कुटुंबात कोरोनाचा संसर्ग झाला आणि ही साखळी वाढत गेली.

पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची सविस्तर मुलाखत | Panvel Municipal Commissioner Sudhakar Deshmukh interview

पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची सविस्तर मुलाखत | Panvel Municipal Commissioner Sudhakar Deshmukh interview

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, July 2, 2020

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने विविध आरोग्य सुविधांची उपाययोजना केली आहे. पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतीतील २००० खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यात कोरोना संशयित रुग्णांची तिथे सोय करण्यात आली आहे. अलगीकरणसह जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, ज्यांच्यात कोरोनाची मेजर चिन्ह दिसत नाहीत , अशा रुग्णांना वेगळ्या खोलीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने गंभीर लक्षणे दिसणार्‍या रुग्णांसाठी एम जी एम हॉस्पिटल कोमोठे आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली आहे. सध्यस्थितीत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात १५० बेड्स आणि , एमजीएम रुग्णालयात ३५० बेड्सची व्यवस्था आहे, अशी माहिती आयुक्त देशमुख यांनी यावेळी दिली.

पावसाळ्यात कोरोना सोबत अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे , त्यामुळे पनवेल शहरात आणखी वैद्यकीय उपाययोजना केल्या जात आहेत .पोलोराइझ खारघर हे खाजगी कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केले आहे, असे देखील देशमुख यांनी सांगितले. पनवेल येथे सुरु करण्यात आलेल्या स्वस्थ रुग्णालयात १०० बेड्स आहेत. सदर खाजगी रुग्णालय ऑक्सिजनसह सर्व सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देणार आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. पनवेल शहरात इतर ठिकाणी जे जे शक्य आहे ते करीत आहोत. देवांशी हॉस्पिटलमध्ये १०० पॉझिटिव्ह रुग्ण घेऊ शकतो, अशी व्यवस्था केली जात आहे. खारघरमध्ये पोलिसांसाठी ५० बेड्सचे रुग्णालय सुरु करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

पनवेलमध्ये टेस्टिंग वाढले आहे. अनलॉकमुळे गर्दी वाढली. त्यामुळे रुग्णांचा आकडा काहीसा वाढला आहे, मात्र मृत्युदर कमी असणे ही जमेची बाजू आहे. मृत्यूचे प्रमाण ३ ते ४ टक्के आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या रोखून मृत्यू दर आणखी कमी करण्यासाठी पनवेलकरांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये. लोकांच्या सेवा करण्याचे निमित्त सांगून फेरफटका मारू नये. घराजवळ अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन आयुक्त देशमुख यांनी केले आहे. शासकीय सेवक व अत्यावश्यक कर्मचार्‍यांनी शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा, आपले कुटुंबियांसाठी, स्वकीयांसाठी काळजी घ्या, असे देखील आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले.

कोरोनाला रोखण्यासाठी अटीतटीची शर्थ
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -