महिलेला अश्लिल ‘व्हाट्सअॅप-मेसेज’ पाठवणा-यांना अटक

व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चौघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Pune
whatsapp
(फोटो प्रातिनिधीक आहे)

महिलेला अश्लिल व्हॉट्सअॅप मेसेज पाठवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. महिलेला वारंवार फोन करून तसेच तिच्या व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार बाळासाहेब प्रभाकर चव्हाण (वय २९, रा. चाकण) आणि जालिंदर नानाभाऊ कुलगुडे (वय २८ ,रा. आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बाप्पा प्रभाकर चव्हाण याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला वेळोवेळी मोबाईलवर फोन करून मानसिक त्रास दिला. तसेच व्हाट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास आरोपींनी महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चिंतेत आलेल्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here