घरमहाराष्ट्रपोलिसाच्या मुलास घरफोडी प्रकरणी अटक

पोलिसाच्या मुलास घरफोडी प्रकरणी अटक

Subscribe

जळगाव येथे पोलिसाच्या मुलास घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

एकीकडे शहर सुरक्षित राहावं यासाठी पोलीस डोळ्यात तेल टाकून पहारा देत असतात, पण दुसरीकडे पोलिसांचेच घर सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासोबतच पोलिसांच्या घरी चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलिसांचा मुलगा असल्याचे सत्य समोर आले आहे. जळगाव येथे एका पोलिसाच्या मुलांने घरफोडी केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या मुलाने ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

जळगाव येथील एका पोलिसाच्या मुलाने दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या १६ वर्षीय तरुणांने पोलिस अधिकाऱ्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा एकूण ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. खुद्द पोलीस अधिका-यांच्याच घरात चोरी झाल्यामुळे पोलिस दलावर नामुष्की ओढवली होती. यापूर्वी होळकर यांच्या घरातून एक मोबाइल लंपास झाला होता. तसेच पुन्हा एकदा याच अल्पवयीन मुलास चोरी करताना रंगेहात पकडले होते. हा मुद्दा हेरून पथकाने संबंधित मुलास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर लोकडे व होळकर यांच्या घरातून चोरलेला संपूर्ण ऐवज देखील काढून दिला.

- Advertisement -

वाचा – नवरा निघाला ‘चोर’, पोलिसांनी केली अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -