घरमहाराष्ट्रराज्यातील ५४ पोलीसांना राष्ट्रपती पदक

राज्यातील ५४ पोलीसांना राष्ट्रपती पदक

Subscribe

१० शौर्य, चार उल्लेखनीय आणि ४० गुणवत्तापूर्वक सेवेचा समावेश

प्रजाकस्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील 54 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात 10 पोलिसांना शौर्य, चार पोलिसांना उल्लेखनीय आणि 40 पोलिसांना पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे.

शौर्यपदकासाठी राज्य पोलीस दलातील निवड झालेल्या 10 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक एस. सी. व्ही महेश्वर रेड्डी, नाशिक ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह द्वारकोजीराव साळवे, गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू नामदेव जगदाळे, गडचिरोली पोलीस नाईक सुरपत बावाजी वड्डे, पोलीस शिपाई आशिष मारोती हलामी, पोलीस शिपाई विनोद चेतराम राऊत, पोलीस शिपाई नंदकुमार उत्तरेश्वर आंग्रे, पोली नाईक अविनाश अशोक कांबळे, पोलीस शिपाई वसंत बुच्चय्या आत्राम आणि पोलीस शिपाई हमीत विनोंद डोंगरे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

गुणवत्तापूर्वक सेवेसाठी यंदा 40 पोलिसांची राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्वांचा राष्ट्रपती पदकाने सत्कार करण्यात येणार आला आहे. त्यात प्रतिनियुक्तीवर सिंगापूरला गेलेले पोलीस अधिक्षक धनंजय रामचंद्र कुलकर्णी, ताडदेव येथील आर्म्स पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार त्र्यंबक ठाकूर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल प्रल्हाद पाटील, सीआयडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त स्टीवन मॅथ्यू अ‍ॅन्थोनी, औरंगाबादचे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त निशीकांत हनुमंत भुजबळ, अकोला पोलीस प्रशिक्षणाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर गोविंद सावंत, नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलस निरीक्षक मिलिंद सुधाकर तोतरे, अकोला येथील रिडर शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद हरिभाऊ मानकर, सीआयडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद गोपाळ पवार, सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक संभाजी सुदाम सावंत, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजाजन लक्ष्मण काब्दुले, कुलाबा येथील गुप्तचर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कायोमेझ बोमन इराणी, अमरावती शहराच्या विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक निलिमा मुरलीधर राज, ठाणे गुप्तचर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजीत किशोर कारले, औरंगाबाद दहशतविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गौतम केशव पातारे, जालना सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष नानासाहेब भुजंग, मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, नवी मुंबईतील तुर्भे वाहतूक विभाागचे पोलीस निरीक्षक किसन अर्जुन गायकवाड, नांदेडच्या पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक जमील इस्माईल सय्यद, कोल्हापूरच्या गंगाबावडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मारुती चौगुले, जळगावच्या मोटार परिवहन विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिकान गोविंद सोनार, अकोल्याचे विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू बळीराम अवताडे, मुंबई गुप्तचर विभागाचे गुप्तचर अधिकारी शशांक लोखंडे, गडचिरोलीचे पोलीस हवालदार अस्पाकली बाकरअली चिस्टीना, एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत निवृत्ती तारते, कोल्हापूरच्या उजलावाडी हायवेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र यलगोंडा नुल्ले, लोकल गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव सवाईराम राठोड, पुणे मावळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ बाबूराव चिंचकर, गडचिरोलीच्या बुड पोलीस कॉलनीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण संभाजी टेंबभुरने, नागपूर शहर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भुटालाल रामलोटन पांडे, नाशिक ग्रामीण एटीएसचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू रत्नागीर गोसावी, पुणे एटीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप हरिश्चंद्र जांभळे, जळगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भगवान पाटील, मुंबई सीआयडीचे मुख्य पोलीस हवालदार भानूदास जगन्नाथ जाधव, मुंबई गुप्तचर विभागाचे मुख्य पोलीस हवालदार नितीन जयवंत मालप, मुंबई उत्तर मुख्य नियंत्रण कक्षाचे पोलीस हवालदार रमेश पांडुरंग शिंगटे, नाशिकचे पोली हवालदार संजय राजाराम वायचळे, नाशिक युनिटच्या गुप्तचर विभाागचे बाबूराव दौलत बिर्‍हाडे यांचा समोवश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -