घरदेश-विदेशशेवटच्या क्षणी मृत्यूच्या दाढेतून परतला जवान

शेवटच्या क्षणी मृत्यूच्या दाढेतून परतला जवान

Subscribe

बसमधून ठका खाली उतरून कॅम्पवर निघून गेले आणि काही तासातच पुलवामामध्ये सीआरपीफच्या नेमक्या त्याच बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी त्यांच्या कळाली.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या भ्याड आत्मघातकी दहशदवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्याची जवाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने घेतली. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशामध्ये शोकाकूळ वातावरण पसरले होते. तर तेवढ्याच तीव्रतेने जनेतेने या हल्ल्याचा निषेध केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवावर शनिवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यातून वाचणे म्हणजेच मृत्यूच्या दाढेतून परतने असेच म्हणू शकतो. अशीच एक घटना सीआरपीएफचे जवान ठका बेलकर यांच्यासोबत घडली.

शेवटच्या क्षणी सुट्टी मंजूर

ठका बेलकर हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील ढोकेश्र्वर टाकळी गावातील रहिवासी आहेत. २८ वर्षांचे ठका बेलकर हे सीआरपीएफच्या ७६ बटालियनमध्ये तैनात होते. लग्नासाठी ठका बेलकर यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता. २४ फेब्रुवारीला लग्न आहे. मात्र, सुट्टी मंजूर झाली नाही तर तुम्हाला ड्यूटीवर जावे लागेल अशा सूचना देण्यात आल्या होत्या. १४ फेब्रुवारी रोजी ठका बेलकर यांना कश्मीर खोऱ्याकडे जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या. एचआर ४९ एफ ०६३७ या बसमधून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ४२ जवानांच्या नावाची यादी तयार झाली होती आणि त्या यादीमध्ये ठका बेलकर यांचे देखील नाव होते. सुट्टी मिळाली नसल्याने ठका यांनी कश्मीरकडे निघण्याची तयारी केली. देशसेवा हे आपले कर्तव्य आहे या भावनेने ते कश्मीर खोऱ्यात जाण्यास निघाले. मात्र, बस निघताना त्यांना एक मॅसेज आला की रजा मंजूर झाली.

- Advertisement -

शेवटचा सॅल्यूट ठरला आदरांजली 

शेवटच्या क्षणी त्यांच्या रजेच्या अर्जाला मंजूरी मिळाली. ही माहीती बसमधल्या सहकाऱ्यांना त्यांनी दिली. ठकाच्या आनंदात त्यांचे सहकारीही सहभागी झाले. बसमधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करुन ठका यांनी त्यांचा निरोप केला. बसमधून ठका खाली उतरून कॅम्पवर निघून गेले आणि काही तासातच पुलवामामध्ये सीआरपीफच्या नेमक्या त्याच बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी त्यांच्या कळाली आणि त्यांना धक्का बसला. कारण त्या बसमधील त्याचे सर्व सहकारी शहीद झाले होते. काही क्षणापूर्वी ठका यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना हसत खेळत, सॅल्यूट करून निरोप घेतला. त्यांचा सॅल्यूट हा त्यांच्यासाठी शेवटची आदरांजली ठरली. हे सगळ पाहून साक्षात मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याची जाणीव ठका बेलकर यांना झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -